मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना
मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना

मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना

sakal_logo
By

rat16p10.jpg
L50489
गुहागर ः समुद्रकिनाऱ्यावर अभियानाची पूर्वतयारी म्हणून स्वच्छता करताना प्रसाद बोले व स्वच्छता विभागाचे कर्मचारी.
------------
मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना
आज किनारा स्वच्छता अभियान ; एक तासाची मोहिम
गुहागर, ता. १६ः जागतिक समुद्रकिनारे स्वच्छतादिनानिमित्त शनिवारी (ता. १७) सप्टेंबर गुहागरकर मानवी साखळी करून समुद्राला राष्ट्रगिताद्वारे मानवंदना देणार आहेत. त्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छताही करणार आहेत. तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे अभियान होणार आहे.
जागतिक समुद्रकिनारे स्वच्छतादिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये तहसीलदार वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली गुहागर नगरपंचायत, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, सागरी सीमामंच, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय व रिगल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आरजीपीपीएल, लायन्स क्लब गुहागर, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, गुहागर तालुका पत्रकार संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, व्याडेश्वर देवस्थान, जीवनश्री प्रतिष्ठान आदी अनेक संस्था संघटना स्वच्छतामोहिमेत सहभागी होणार आहेत.
प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजनाबाबत वराळे म्हणाल्या, शनिवारी सकाळी ९ वाजता पोलिस परेड मैदानासमोरील समुद्रकिनाऱ्यावर सर्वजण एकत्र येतील. सव्वानऊ वाजता राष्ट्रगीताने अभियानाची सुरवात होईल. त्यानंतर प्रतिज्ञा घेऊन सर्वजण मानवी साखळी करून सागराला मानवंदना देतील. ही साखळी २ किमीपेक्षा अधिक अंतराची असेल. त्यानंतर एक तास सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करतील. अभियानासाठी आवश्यक असलेले साहित्य, पाणी आदी व्यवस्था आरजपीपीएल व गुहागर नगरपंचायत करणार आहे. अभियानानंतरही समुद्रावर गोळा झालेला कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागामार्फत केली जाणार आहे. अभियान संपल्यावर अल्पोपाहाराची व्यवस्था लायन्स क्लब गुहागर आणि सागरी सीमामंच करणार आहे. प्रत्यक्ष स्वच्छतेसंबंधीचे नियोजन होमगार्ड तालुका समादेशक कांबळे, गुहागर हायस्कूल, खरे-ढेरे महाविद्यालय आणि रिगल कॉलेजचे शिक्षक करणार आहेत. या अभियानामध्ये गुहागरमधील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वराळे यांनी केले आहे.
----------
चौकट
नगरपंचायतीने आधीच सुरू केली मोहीम
सतत पडणाऱ्या पावसामुळे व उधाणाच्या भरतीमुळे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड कचरा आला आहे. १७ सप्टेंबरच्या स्वच्छता मोहिमेला गती मिळावी म्हणून गेले तीन दिवस गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता सभापती प्रसाद बोले आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसह समुद्रकिनाऱ्यावरील कचरा दूर करण्याचे काम करत आहेत. या मोहिमेसाठी आवश्यक सर्व साहित्याची व्यवस्था गुहागर नगरपंचायत करणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96731 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..