राजापूर-कुणबी पतपेढीला 70 लाखाचा निव्वळ नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-कुणबी पतपेढीला 70 लाखाचा निव्वळ नफा
राजापूर-कुणबी पतपेढीला 70 लाखाचा निव्वळ नफा

राजापूर-कुणबी पतपेढीला 70 लाखाचा निव्वळ नफा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१६p१६.jpg ः KOP२२L५०५२० राजापूर ः आर्थिक उलाढालीची माहिती देताना राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर.
-----------

राजापूर कुणबी पतपेढीला
७० लाखाचा निव्वळ नफा
--
प्रकाश मांडवकर ; रविवारी सर्वसाधारण सभा
राजापूर, ता. १६ ः कोरोना महामारी, बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि विविध आव्हानांचा सामना करत राजापूर तालुका कुणबी पतपेढीने २०२१-२२ या वर्षामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तब्बल २३ टक्के एकत्रित व्यवसाय जादा केला आहे. एक कोटी २० लाख रुपयांचा ढोबळ, तर ७० लाख ५ हजार रुपयांचा निव्वळ नफा कमवल्याची माहिती पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांनी दिली. नव्या शाखांचा विस्तार करताना लक्षवेधी केलेल्या कामगिरीच्या जोरावर बॅंकेने सलग तिसर्‍या वर्षी दीपस्तंभ पुरस्कारावर यशाची मोहोर उमटवल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राजापूर तालुका कुणबी पतपेढीची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १८) चेअरमन मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मांडवकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी संचालक अशोक तोरस्कर, तुकाराम भिकणे, स्मिता पवार, अपेक्षा मासये, अंकिता तांबे, सुहास पराडकर, लक्ष्मण सावंत, अविनाश नवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर आदी उपस्थित होते. श्री. मांडवकर म्हणाले, बँकेचे रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर झाले असून चार नव्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. एटीएम सुविधा सुरू करण्यात आली असून, भविष्यामध्ये लॉकर सुरू करण्याचा मानस आहे. यावर्षी चांगला फायदा झाला असून, संचालक मंडळाने १२ टक्के लाभाशांची शिफारस केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96755 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..