तुटणारे संसार पुन्हा नांदू शकतील - अनुराधा भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुटणारे संसार पुन्हा नांदू शकतील - अनुराधा भोसले
तुटणारे संसार पुन्हा नांदू शकतील - अनुराधा भोसले

तुटणारे संसार पुन्हा नांदू शकतील - अनुराधा भोसले

sakal_logo
By

swt१६१८.jpg
५०५३२
सावंतवाडीः कौटुंबिक समस्या समुपदेशन केंद्राचे फित कापून उद्घाटन करताना अनुराधा भोसले. सोबत अर्चना घारे-परब, विनया बाड आदी.

तुटणारे संसार पुन्हा नांदू शकतील
अनुराधा भोसले यांचा विश्वास; सावंतवाडीत कौटुंबिक समस्या समुपदेशन केंद्राचे उद्धाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः कौटुंबिक समस्यांच्या निवारणासाठी समुपदेशन केंद्राचा आधार घेतल्यास तुटणारे अनेक संसार पुन्हा नव्याने नांदू शकतात. मात्र, त्यासाठी आता महिलांसह पुरुषांनी सुद्धा बेधडक पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या पत्नी अनुराधा भोसले यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून राज्यात राबविलेली कौटुंबिक समस्या समुपदेशन केंद्राची संकल्पना स्तुत्य आहे. त्याचा अनेकांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडीतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आज सौ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सिंधुदुर्ग समन्वयक अर्चना घारे-परब, रोटरी क्लबच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनया बाड, अ‍ॅड. रेवती राणे, चित्रा बाबर-देसाई, सेंटरच्या कौन्सिलिर मीनाक्षी, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रेया माळकर, वेदीका गावडे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरु, राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, शहराध्यक्ष देवा टेमकर, नवल साटेलकर, रिद्धी परब उपस्थित होते.
सौ. घारे-परब म्हणाल्या, "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संचलित संसदरत्न खासदार सुळे यांच्या संकल्पनेतून विधी साक्षरता अभियानांतर्गत कौटुंबिक समस्या समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या केंद्राच उद्घाटन सावंतवाडी शहरात होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. कौटुंबिक समस्या या प्रत्येक घरात असतात, त्या काहीवेळा चव्हाट्यावर येऊन अडचणी निर्माण होतात. यावेळी जायचं कुठे ? हा प्रश्न महिलांसमोर पडतो. खासदार सुळे यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यावेळी महिलांमध्ये विधी साक्षरतेचा अभाव असल्याच जाणवले. हिंसाचार झाल्यावर पोलिस ठाण्यात जायला महिला घाबरतात. त्यामुळे महिलांसाठी केंद्र स्थापन करण्याचा खासदार सुळे यांचा मानस होता‌. त्यानुसार महाराष्ट्रात १० समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन केंद्र सुरू होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सावंतवाडीत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून काउंन्सीलरसह तीन महिला विधीतज्ञ काम पाहणार आहेत. लग्न जुळवणे हे पुण्याचे काम आहे. परंतु, एखादे घर तुटण्यापासून वाचवणे त्याहून पुंण्याचे काम आहे. नुसते समुपदेशन व कायदेशीर समुपदेशन यात फरक आहे. १०० हून अधिक अशा केसेस हाताळणाऱ्या महिला या केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या भावनिक, आर्थिक, लैंगिक छळांसह हुंडाबळी, हिंसाचारासारखे प्रकार थांबवण्यासाठी सुद्धा मदत होईल." दरम्यान, खासदार सुळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96768 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..