‘ई-पीक’बाबत आचऱ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ई-पीक’बाबत आचऱ्यात
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘ई-पीक’बाबत आचऱ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘ई-पीक’बाबत आचऱ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

50537
आचरा ः येथे विद्यार्थ्यांना ई-पीक नोंदणीबाबत मार्गदर्शन करताना महसूलचे कर्मचारी.

‘ई-पीक’बाबत आचऱ्यात
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आचरा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ई-पीक नोंदणी करणे अवघड होत असल्याने याबाबत मुलांमध्ये जागृती केल्यास नोंदणी करणे सुलभ होऊ शकते, या दृष्टीने महसूल कृषी कर्मचाऱ्यांनी आचरा हायस्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये ई-पीक अॅपमार्फत नोंदणी कशी करायची? याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी आचरा मंडल अधिकारी अजय परब, तलाठी अनिल काळे, कृषी विभागाचे सुशीलकुमार शिंदे, इंग्लिश मीडिअम स्कूलच्या प्रिन्सिपल मायलीन फर्नांडिस आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी बांधवांनी ३० सप्टेंबरपर्यंत ई-पीक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मंडल अधिकारी श्री. परब यांनी केले.
--------
50538
बांदा ः नाबर शाळेत कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांबरोबर मुख्याध्यापिका मनाली देसाई. सोबत इतर शिक्षक.

नाबर प्रशाळेत हिंदी दिन
बांदा ः श्री. मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश माध्यमाच्या प्रशाळेत हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित हिंदी कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी भाषेतून संभाषण केले. मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. स्पर्धेचा निकाल असा ः पहिली व दुसरी गट- (प्रथम तीन क्रमांकानुसार)- युगंधरा ओगले, वंश राणे, श्रेया हळदणकर. तिसरी ते चौथी गट- आराध्या कुडव, अन्वयी पवार, वैभवी धुरी. पाचवी ते सातवी गट- रत्नाकर ओगले, संस्कार शिरोडकर, विहान अधिकारी. आठवी ते दहावी गट- अनुष्का पंडित, अल्फीया खतीब, सरहान खान. शिक्षिका रीना मोरजकर, सुमित्रा सावंत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्नेहा नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96779 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..