एसटीच्या अनागोंदी कारभाराचा शासकिय कर्मचाऱ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या अनागोंदी कारभाराचा शासकिय कर्मचाऱ्यांना फटका
एसटीच्या अनागोंदी कारभाराचा शासकिय कर्मचाऱ्यांना फटका

एसटीच्या अनागोंदी कारभाराचा शासकिय कर्मचाऱ्यांना फटका

sakal_logo
By

एसटीच्या अनागोंदी कारभाराचा शासकिय कर्मचाऱ्यांना फटका
‘लेट कमिंग’ छिक्का ः जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनाकडेही दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ः कणकवलीहून जिल्हा मुख्यालय येथे कार्यालयीन वेळेत येणारी एसटी अनियमित वेळेत येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना ''लेट मस्टर''ला सामोरे जावे लागत आहे. सायंकाळीही रोज एसटीची तासन तास प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे कुणी लक्ष देईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य विभागातील कर्मचारी नेहमी कणकवली-सिंधुदुर्गनगरी या एसटीने येतात. सध्या गेली दोन महिने सकाळच्या सत्रातील येणारी एसटी वेळेस सुटत नसल्यामुळे जिल्हा परिषद व अन्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे लेट मस्टरला सामोरे जावे लागत आहे. सायंकाळीही सव्वा सहा वाजता येणारी बस रात्री उशिरापर्यंत येत असल्यामुळे एसटीची वाट पहावी लागत आहे. घरी वेळेत जाता येत नाही. एसटी महामंडळाच्या अनागोंदी कारभाराचा फटका कर्मचाऱ्याना बसत आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून एसटी विभागनियंत्रक याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. एसटी महामंडळाचा या आडमुठे धोरणामुळे सिंधुदूगनगरी येथे येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नाहक ञास होत असून या प्रश्नांकडे जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून एसटी प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे अजूनही एसटी महामंडळ दुर्लक्ष करत आहे. याप्रश्नी एसटीचे विभाग नियंत्रकानी लक्ष न दिल्यास कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव योग्य ती आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96785 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..