वराडकर, भंडारी हायस्कूल प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराडकर, भंडारी हायस्कूल प्रथम
वराडकर, भंडारी हायस्कूल प्रथम

वराडकर, भंडारी हायस्कूल प्रथम

sakal_logo
By

50545
मालवण ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.


वराडकर, भंडारी हायस्कूल प्रथम

मालवणचे विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे दर्शन, गुणवंताचा गौरव


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये वराडकर हायस्कूल प्रथम तर माध्यमिक विभागातून भंडारी एज्यूकेशन सोसायटी हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.
४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्यमहोत्सव पंचायत समिती शिक्षण विभाग मालवण, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धीविनायक सभागृहात झाला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी केले. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, मंडळाचे सल्लागार व्हीक्टर डान्टस, शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत, अजय शिंदे, टी. के. पाटील, कट्टा बीट शिक्षण विस्तार अधिकारी सविता परब, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, कट्टा कॉलेजचे प्राचार्य विनायक जमदाडे आदी उपस्थित होते.
निकाल असा ः विद्यार्थी प्रतिकृती प्रथम-हर्षिता कानुरकर (वराडकर हायस्कूल कट्टा), द्वितीय- हर्षिता गावकर (टोपीवाला कन्याशाळा), तृतीय- ऋषी धुरी ( शिवाजी विद्यामंदिर काळसे ). माध्यमिक विभाग विद्यार्थी प्रतिकृती- प्रथम- श्रावणी गावकर ( भंडारी हायस्कूल, मालवण), द्वितीय- मिहीर गावकर ( प्रगत विद्यामंदिर रामगड ), तृतीय - राज गावकर (त्रिमुर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे) निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग- प्रथम- आकांक्षा तोंडवळकर (जि. प. पूर्ण प्रा. शाळा वरची तोंडवळी), द्वितीय- सान्वी म्हाडगुत (वरसकर विद्यामंदिर वराड ), तृतीय - वेदिका परब ( वर्दम हायस्कूल पोईप ). निबंध स्पर्धा – माध्यमिक विभाग - प्रथम - मिलींद मुरवणे (टोपीवाला हायस्कूल). द्वितीय- ओंकार वराडकर (वरसकर विद्यामंदिर वराड), तृतीय- वैष्णवी जिकमडे ( प्रगत विद्यामंदिर रामगड ) प्राथमिक विभाग- वक्तृत्व स्पर्धा - प्रथम- ध्रुवी भाट ( वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा. कट्टा), द्वितीय- रोशन साळुंखे (टोपीवाला हायस्कूल), तृतीय- सई घुटूकडे (न्यू इंग्लिश स्कूल आचरा). माध्यमिक विभाग प्रथम- दर्श सामंत (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय - सम्राट राजे (भंडारी एज्युकेशन सोसायटी) तृतीय - साक्षी जीकमडे (प्रगत विद्यामंदिर) विज्ञान मेळावा उच्च माध्यमिक गट - प्रथम- श्रेया चांदरकर (वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ), द्वितीय- आर्यन प्रभूगावकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय- वेदांत गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल आचरा). दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे. यावेळी वनपाल पी. व्ही. शिंदे यांनी व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. विणा शिरोडकर, किसन हडलगेकर, प्रकाश कानूरकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय नाईक यांनी आभार मानले.
---
चौकट
इतर स्पर्धांचा निकाल असा
नाट्यमहोत्सव प्रथम - भावेश वराडकर व भंडारी एज्यूकेशन सो. हायस्कूल मालवण, द्वितीय- पार्थ नलावडे व इतर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा. प्रयोगशाळा परिचर प्रथम- संदीप धामापूरकर ( शिवाजी विद्यामंदिर काळसे). प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रथम- देविदास प्रभूगावकर (जि. प. प्रा. शाळा हडी नं. १ ), द्वितीय - गुरूनाथ ताह्मणकर (जि. प. मसुरे नं. १), तृतीय- दीपक ठाकरे (जि. प. ओवळीये नं. १) माध्यमिक शिक्षक - शैक्षणिक साहित्य प्रथम- प्रकाश कानूरकर (वराडकर हायस्कूल कट्टा), द्वितीय - विष्णू काणेकर (त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे), तृतीय- दिव्या वाईरकर (वराडकर इंग्लिश मीडिमय स्कूल कट्टा).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96797 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..