कारिवडेत नागाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारिवडेत नागाला जीवदान
कारिवडेत नागाला जीवदान

कारिवडेत नागाला जीवदान

sakal_logo
By

50549
कारिवडेः भैरववाडी नागाला जीवदान देताना सर्पमित्र.

कारिवडेत नागाला जीवदान
सावंतवाडी ः कारिवडे-भैरववाडी येथील सदानंद साईल यांच्या घरात आलेल्या नागाला सर्पमित्र राजन निब्रे यांनी जीवदान दिले. ही घटना काल दुपारी घडली. घरात नाग आल्यामुळे सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. मात्र, साईल यांनी त्या नागाला कोणतीही दुखापत न करता याबाबतची माहिती श्री. निब्रे यांना दिली. त्यानुसार त्यांनी माजगाव येथून तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या नागाला जेरबंद केले व नैसर्गिक अधिवास सोडले.
--
दोडामार्गला सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः चोवीस तासांत दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ५३.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २४.० मिलीमीटर पाऊस झाला. तर एकूण सरासरी ३०६०.३ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय आकडेवारी अशी ः कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात ः देवगड- १५.९ (२४३६.४), मालवण- २३.२ (२७६५.१), सावंतवाडी- २३.० (३४११.१), वेंगुर्ले- १२.४ (२८६०.६), कणकवली- २४.३ (३२६६.७), कुडाळ- ३२.० (३२५६.५), वैभववाडी- २२.७ (३६३८.६), दोडामार्ग- ५३.० (३४३४.४).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96804 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..