जिल्ह्यात २९ पर्यंत मनाई आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात २९ पर्यंत मनाई आदेश
जिल्ह्यात २९ पर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात २९ पर्यंत मनाई आदेश

sakal_logo
By

जिल्ह्यात २९ पर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी ः घटस्थापना, नवरात्र आरंभ होणार आहे. उत्सवाच्या काळात धार्मिक देवकार्य करताना मानापानावरुन वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी २९ सप्टेंबर रात्री १२ पर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले आहेत. काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गटांत काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडल्या आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
---
दारू वाहतूक; एकाला जामीन
सावंतवाडी ः बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी वाफोली येथील संजय मारुती गवस याची आज येथील न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. याकामी अ‍ॅड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. ही कारवाई ९ सप्टेंबरला बांदा येथे करण्यात आली होती. त्याच्याकडुन आयशर टेम्पोसह ५५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही कारवाई कोल्हापुर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून करण्यात आली होती. त्यानंतर अटक करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पंधरा हजाराच्या जामीनावर त्याची मुक्तता करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96814 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..