मानधन नको; वेतनच द्यावे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानधन नको; वेतनच द्यावे!
मानधन नको; वेतनच द्यावे!

मानधन नको; वेतनच द्यावे!

sakal_logo
By

50479
सिंधुदुर्गनगरी ः येथे शुक्रवारी काढलेल्या मोर्चात सहभागी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी.

मानधन नको; वेतनच द्यावे!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी; विविध मागण्यांसाठी मुख्यालयात मोर्चा


सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनागरी, ता. १६ ः अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या तिमाही सभा घ्याव्यात, मानधन नको वेतन द्या, किमान वेतन १८ हजार रूपये द्या यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांना दिले.
अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाड़ी कर्मचाऱ्यांनी आज ओरोस फाटा ते जिल्हा परिषद कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ‘‘आम्हाला मानधन नको, वेतन द्या, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती द्या, किमान वेतन १८ हजार द्या,’’ अशा घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या परुळेकर यांनी मोर्चाला संबोधित करताना शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कमी मानधनात अनेक उपक्रम राबवून घेतले जात आहेत. मात्र, लाभ देताना वेळ काढून धोरण अवलंबले जात आहे, असा आरोप केला. कर्मचाऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष पसरला आहे. तरी शासनाने वेळीच दखल घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांची भेट घेत त्यांच्याकडे सादर केले. यावेळी परुळेकर, शालिनी तारकर, रोहिणी लाड, शितल साळुंखे, शोभा सावंत, दिपाली पठाणी, कांचन शेनई, स्वाती पोचेकर, गुलाब चव्हाण आदी संघटनांच्या तालुका पदाधिकारी उपस्थित होत्या.
------------

प्रमुख मागण्या
- जिल्हा व तालुकास्तरावरील तक्रार निवारण समितीच्या सभा दर तीन महिन्यांनी घ्याव्यात
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरा
- सुपरवायझरची पदे अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावीत
- १० ते ३० वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन वाढ द्यावी
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव तात्काळ शासनाला पाठवावेत
- पाच वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असणाऱ्या सुपरवायझरची इतर तालुक्यात बदली करा
- पतसंस्थेचे पैसे पतसंस्थेकडे वर्ग करताना होणारा विलंब टाळावा
- पोषण ट्रॅकर मराठीत पूर्णपणे येईपर्यंत तो न भरणाऱ्या सेविकांवर कोणतीही कारवाई करू नये
- गावगुंडांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास तात्काळ थांबवावा
- प्रलंबित प्रवास बिले तातडीने द्यावीत
- मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96831 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..