कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध मिसळून मुलीवर अत्याचार मिसळून मुलीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध
मिसळून मुलीवर अत्याचार

मिसळून मुलीवर अत्याचार
कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध मिसळून मुलीवर अत्याचार मिसळून मुलीवर अत्याचार

कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध मिसळून मुलीवर अत्याचार मिसळून मुलीवर अत्याचार

sakal_logo
By

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध
मिसळून मुलीवर अत्याचार
तरुण अटकेत; चार दिवसांची कोठडी
सावंतवाडी, ता. १६ ः एका अल्पवयीन मुलीवर कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून अत्याचार झाला आहे. संबंधित मुलगी गर्भवती आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका पोलिस ठाण्यात संबधित संशयित युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे, असे सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संबंधित मुलीशी त्या युवकाची मैत्री होती. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने त्या मुलीला आपल्या मैत्रिणीच्या घरी बोलाविले आणि तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध घालून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार दोन एप्रिलला घडला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे नातेवाईक तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले. तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल रात्री उशिरा संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पहाटे अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96837 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..