आमदार नाईकांमुळेच शिवसेनेत गटबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नाईकांमुळेच शिवसेनेत गटबाजी
आमदार नाईकांमुळेच शिवसेनेत गटबाजी

आमदार नाईकांमुळेच शिवसेनेत गटबाजी

sakal_logo
By

50662
कणकवली : येथील शिवसेना शिंदे गट कार्यालयात विलास साळसकर यांचे स्वागत करताना संदेश पटेल. बाजूला शेखर राणे, दिलीप गावकर, सुनिल पारकर आदी.

आमदार नाईकांमुळेच शिवसेनेत गटबाजी

विलास साळसकर यांचा आरोप; पक्षप्रमुखांना भेटूनही न्याय मिळत नसल्‍याने शिंदे गटात

कणकवली, ता.१७ : सिंधुदुर्गातील शिवसेनेत आमदार वैभव नाईक यांनी गटबाजी निर्माण केली. यात पहिल्‍या फळीतील आम्‍ही कार्यकर्ते चौथ्या, पाचव्या फळीत फेकले गेलो. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन म्‍हणणे मांडले; मात्र न्याय मिळत नसल्‍याने आपण शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्‍याचे शिवसेनेचे माजी उपजिल्‍हाप्रमुख विलास साळसकर यांनी आज स्पष्‍ट केले.
येथील शिवसेनेच्या शिंदे गट कार्यालयात श्री.साळसकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी संदेश पटेल, सुनिल पारकर, शेखर राणे, दिलीप गावकर व पदाधिकारी उपस्थित होते. साळसकर म्‍हणाले, शिवसेना सोडल्यानंतर २००७ पासून देवगड तालुक्यात पाच तालुकाप्रमुख झाले. त्यातील कोणीही प्रामाणिक राहिले नाहीत. मी मात्र व्यवसाय सोडून प्रामाणिक राहिलो. जे काही शिवसैनिक होते, त्यांना घेऊन काम केलं. माझ्या जागेवर दोन तालुकाप्रमुख केले. त्यांना माझ्यावर व माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांवर लादले गेले. त्यामुळे मी नाराज होतोच. पदाधिकाऱ्यांची नाराजी होती. त्यांची समजूत काढली होती. पुन्हा चार विभागाचा तालुकाप्रमुख बनवण्यात आले. ५ ऑगस्टला आमदार वैभव नाईक यांनी फोन केला, बैठका नियोजन करायला सांगितले. पुन्हा नाईक फोन करतात, तिकडचे काही पदाधिकारी म्हणतात, विलास साळसकर यांना बदला, त्यानुसार दुसऱ्याला तालुकाप्रमुख नेमले. त्याची विचारणा नाईक यांच्याकडे केली. त्यांनी तर खासदार व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर बोलावं लागेल, असे सांगितले. त्यानंतर काका राऊत यांना बोलावून उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
---
चौकट
नाईकांविरोधात जिल्ह्यात नाराजी
साळसकर म्‍हणाले, आपणावर होत असलेल्‍या अन्यायाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; पण पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळत नसेल, तर काय करायचे? म्हणून मी नाराजीने निर्णय घेतला. शिंदे गटात मी सहभागी झालो आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आमदार नाईकांविरोधात नाराजी आहे. मी पुढे आलो, आठही तालुक्यात नाराजी आहे.
--
चौकट
पारकरांनी देवगडचे श्रेय घेतले
मिलिंद साटम यांनी विभाग बैठका लावायच्या आहेत असे सांगून फोन केला. त्यानंतर मेसेज केला. त्यात सगळ्यांची नावे होती. माझं नाव नसल्याने विचारणा केली. तेव्हा तुमच्याकडे पद नाही. तेव्हा साटम यांना संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे यांच्याकडे कुठले पद आहे? अशी विचारणा केली. देवगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही काम केलं त्यामुळेच विजय झाला. कणकवलीत चमकेशगिरी करणारे नेते देवगडात आले. संदेश पारकर यांनी देवगड नगरपंचायत जिंकण्याचे श्रेय घेतले, असा आरोपही साळसकरांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96967 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..