प्रकाश कदमांना दोन पारितोषिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश कदमांना
दोन पारितोषिके
प्रकाश कदमांना दोन पारितोषिके

प्रकाश कदमांना दोन पारितोषिके

sakal_logo
By

प्रकाश कदमांना
दोन पारितोषिके
दोडामार्ग, ता. १७ ः भारत सरकार रक्षा मंत्रालय (डी.जी.क्यू.ए.) मुंबई येथे हिंदी सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल हिंदी भाषा दिनी घोषित करण्यात आला. यामध्ये आडाळी गावचे सुपुत्र प्रकाश कदम यांना दोन पारितोषिके प्राप्त झाली. जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार, प्रदर्शनकार आणि पर्यावरण अभ्यासक कदम हे सध्या मुंबईमध्ये नोकरीस आहेत. नोकरी करून ते निसर्ग भटकंती करीत असतात. हिंदी पंधरवड्यादरम्यान घेतलेल्या हिंदी भाषा स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी हिंदी निबंध आणि हिंदी भाषण या स्पर्धांमध्ये तृतीय पुरस्कार प्राप्त केला. अधिकारी ले. कर्नल एस. के. जायस्वाल यांच्या हस्ते ही पारितोषिके त्यांना प्रदान करण्यात आली.
----------------
घावनळे येथे
भजन स्पर्धा
कुडाळ, ता. १७ ः घावनळे (कासमळा) नमसवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत भजन स्पर्धा आयोजित केली आहे. रोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज २० पर्यंत स्वीकारले जातील. प्रथम क्रमांक ७,७७७ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय ५५५५ रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय १ हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. शिवाय उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, तबला वादक आणि चक्की वादक यांना प्रशस्तिपत्र व मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक भजन मंडळांनी दादा गवस किंवा उदय सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---------------
सजावट स्पर्धेत
आमडोसकर प्रथम
वेंगुर्ले, ता. १७ ः युवा कला, क्रीडा मंडळ पाल-वेंगुर्ले आयोजित गाव मर्यादित पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथमेश आमडोसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. द्वितीय क्रमांक रमेश घाडी, तृतीय क्रमांक पांडुरंग उर्फ आबा मांजरेकर यांनी, तर आकर्षक गणेशमूर्तीबद्दल आपा गावडे यांनी उतेजनार्थ क्रमांकासह पारितोषिके पटकाविली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. सचिन परुळकर व संजय पाटील यांनी केले. प्रा. परुळकर यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण गावडे, जगन्नाथ गावडे, सिद्धेश गावडे, वैभव गावडे, प्रथमेश गावडे, साबाजी राऊळ, मोहन पालकर यांनी परिश्रम घेतले.
.....................
सावरकर पतसंस्थेची
२८ ला वार्षिक सभा
सावंतवाडी, ता. १७ ः वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.२८) सकाळी अकराला येथील आशीर्वाद मंगल कार्यालय, सबनीसवाडा येथे आयोजित केली आहे. सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन शैलेश पई यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96973 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..