केसरकरांच्या कार्यालयाचा फलक बदलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांच्या कार्यालयाचा फलक बदलला
केसरकरांच्या कार्यालयाचा फलक बदलला

केसरकरांच्या कार्यालयाचा फलक बदलला

sakal_logo
By

50656
सावंतवाडी ः मंत्री केसरकर यांच्या संपर्क कार्यालयावर नव्याने बसविलेला फलक.


केसरकरांच्या कार्यालयाचा फलक बदलला

शिंदे गट; जिल्ह्यातील चर्चेला अखेर पूर्णविराम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी संपर्क कार्यालयावरील फलकावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा फोटो असलेला फलक हटवून त्या ठिकाणी नवा फलक बसविला आहे. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यभर आपले जाळे तयार केले.
दरम्यान, शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या मंत्री केसरकरांनी अचानक शिंदे गटाशी संधान साधत त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यावर शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. नव्या सरकारमध्ये मंत्री झाले असले तरी केसरकरांनी आपल्या कार्यालयावर असलेला फलक बदलला नव्हता. तेथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रतिमा असलेला फलक तसाच होता. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता. अनेक राजकीय विरोधकांनी फलकाचे छायाचित्रे काढून जोरदार चर्चा केली होती.
--
काय आहे फलकावर
महाविकास आघाडीला धक्कातंत्र देत शिंदे गटात दाखल झालेल्या शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानावर आता शिंदे गटातील आणि भाजप नेत्यांचा समावेश असलेला फलक लावला आहे. त्या ठिकाणी ‘संपर्क कार्यालय’, असा उल्लेख असून, बाजूला दोन भगवे देखील दिसत आहेत. गेले काही महिने मंत्री केसरकर यांनी आपल्या कार्यालयावर असलेला बॅनर बदलला नसल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांत चर्चा होती. यावर टीका-टिप्पणीही झाली होती; मात्र अखेर फलक बदलल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री केसरकर उद्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर हा बदल केल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96974 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..