कणकवलीत नवा रस्ता प्रस्तावित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत नवा रस्ता प्रस्तावित
कणकवलीत नवा रस्ता प्रस्तावित

कणकवलीत नवा रस्ता प्रस्तावित

sakal_logo
By

50667
कणकवली : शहरातील तहसील कार्यालयाकडे हा रस्ता थेट महामार्गाच्या सेवा रस्त्याला जोडला जाणार आहे.


कणकवलीत नवा रस्ता प्रस्तावित

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून पाहणी; नगरपंचायतीतर्फे दीड वर्षांत शहरात तीन रस्ते

कणकवली, ता.१७ : नगरपंचायतीच्यावतीने गेल्‍या दीड वर्षांत शहरात तीन नवीन रस्ते तयार केले. त्‍यानंतर आता प्रांत कार्यालय आणि ॲड. उमेश सावंत यांचे घर यांच्यामधून आणखी एक नवीन रस्ता खुला होणार आहे. त्‍याअनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी या रस्त्याची पाहणी केली.
कणकवली बाजारपेठ आणि राष्‍ट्रीय महामार्ग यांना जोडणारा ढालकाठी, कणकवली कॉलेजमार्गे जाणारा रस्ता तहसील कार्यालगतच्या काणेकर हॉटेल पर्यंत संपला होता. त्‍यामुळे महसूलच्या जागेतून हा रस्ता तहसील कार्यालयाच्या गेट पर्यंत जोडण्यात आला. मात्र आता काणेकर हॉटेल ते राष्‍ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता असा प्रांत कार्यालय आणि ॲड.उमेश सावंत यांच्या जागेतून थेट नवा रस्ता होणार आहे. यात नऊ मीटर रूंद आणि ७० मीटर लांबीचा हा नवा रस्ता असणार आहे. या नव्या रस्त्यामध्ये प्रांताधिकारी कार्यालयाची काही जमीन, प्रांताधिकारी कार्यालयाची शेड, स्वच्छतागृह, तसेच पाण्याची टाकी बाधित होणार आहे. तसेच ॲड. उमेश सावंत यांची देखील काही जमीन या रस्त्यासाठी जाणार आहे. यात बाधित होणाऱ्या मालमत्ता जिल्‍हा नगरपंचायतीच्या माध्यमातून बांधून देण्याबाबत नगरपंचायत आणि प्रांताधिकारी कार्यालयात चर्चा सुरू असल्‍याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. दरम्‍यान, नवा रस्ता तयार झाल्‍यानंतर काणेकर हॉटेल ते तहसील कार्यालयाचे गेट या पर्यंतचा रस्ता रद्द करून ती जागा प्रांताधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरणासाठी दिली जाणार आहे. नव्या रस्त्यामुळे येथील वळसा कमी होणार असून बाजारपेठ ढालकाठी कडून येणारा रस्ता थेट महामार्ग सेवा रस्त्याशी जोडला जाणार आहे. तसेच प्रांत कार्यालयाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यांची सुविधा निर्माण होणार आहे.
---
मंजुरीनंतर निधीही घेणार
प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडून महसूलच्या जागेबाबत निर्णय होऊन या संदर्भात आवश्यक त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या रस्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही मंजुरी मिळाल्यावर तातडीने नगरपंचायत कडून या रस्त्याकरिता लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार निधी देखील तत्काळ मंजूर करून घेतला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96980 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..