पावसमधील पाच किनाऱ्यांची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसमधील पाच किनाऱ्यांची स्वच्छता
पावसमधील पाच किनाऱ्यांची स्वच्छता

पावसमधील पाच किनाऱ्यांची स्वच्छता

sakal_logo
By

rat17p13.jpg-
50663
पावसः गावखडी व पूर्णगड समुद्रकिनारी स्वच्छ सागरतट अभियानांतर्गत स्वच्छता करताना ग्रामपंचायतीचे सदस्य, बचतगट, विद्यार्थी व पोलिस प्रशासन.
---------------
पावसमधील पाच किनाऱ्यांची स्वच्छता
सागरतट अभियान ; बाटल्या, प्लास्टिक पिशव्यांचा खच
पावस, ता. १७ः स्वच्छ सागरतट अभियानांतर्गत पावस परिसरातील पाच ठिकाणचे समुद्रकिनारी स्वच्छता अभियान करण्यात आले. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे दर महिन्याला किनारा स्वच्छतेचे काम हाती घेण्यात यावे, या मागणीला प्रतिसाद मिळत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समुद्रकिनारी पर्यटनाकरिता येणाऱ्या पर्यटकांना मोकळा श्वास घेता यावा व त्यांना समुद्रकिनारी वावरताना स्वच्छतेची जाण व्हावी याकरिता स्वच्छ सागरतट अभियानाच्या माध्यमातून समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या निमित्ताने या पावस परिसरातील गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, रनपार वायंगणी अशा पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच समुद्रकिनारी ग्रामपंचायत, बचतगट, स्थानिक संस्था, पोलिस व ग्रामस्थ त्याचबरोबर शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातून श्रमदान करून किनारा स्वच्छता करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यात प्रामुख्याने गावखडी व पूर्णगड या दोन्ही ठिकाणी मुस्लिम महिलावर्गांचा व शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास या पाच ठिकाणी किनारा स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.
या वेळी गावखडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान सुरू करताना सरपंच मुरलीधर तोडणकर यांनी विद्यार्थी, बचतगट यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना सांगितले, हे अभियान एक दिवसाचे नसून याकडे भविष्याच्यादृष्टीने चांगला दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करण्यास प्रत्येक नागरिक तयार होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक पॉलिथिन कसे वापरावे, त्याचा पुनर्वापर कसा करावा याची दक्षता घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवणे काळाची गरज आहे. त्यानंतर स्वच्छता अभियानाला सुरवात झाली. दिवसेंदिवस समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे बाटल्यांचा खच पडलेला होता. या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा जमा करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96984 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..