संभाजीनगर गुरववाडीला अखेर बसथांबा निवारा शेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीनगर गुरववाडीला 
अखेर बसथांबा निवारा शेड
संभाजीनगर गुरववाडीला अखेर बसथांबा निवारा शेड

संभाजीनगर गुरववाडीला अखेर बसथांबा निवारा शेड

sakal_logo
By

50689
खारेपाटण : येथील संभाजीनगर गुरववाडी बसथांबा निवारा शेडचे उद्‌घाटन करताना सरपंच रमाकांत राऊत.


संभाजीनगर गुरववाडीला
अखेर बसथांबा निवाराशेड
खारेपाटण, ता. १७ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील खारेपाटण येथील संभाजीनगर गुरववाडी बसथांबा निवारा शेडचे उद्‍घाटन सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते आज झाले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, खारेपाटण गटविकास सोसायटीचे संचालक श्रीधर गुरव यांच्यासह खारेपाटण संभाजीनगर गुरववाडी विकास मंडळाचे मुंबई व ग्रामीण स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. खारेपाटण ग्रामपंचायत व खारेपाटण संभाजीनगर गुरववाडी विकास मंडळ खारेपाटणच्या संयुक्त विद्यमाने बसथांबा निवारा शेडची उभारणी करण्यात आली. बऱ्याच वर्षांनी मागणी पूर्ण झाल्याने स्थानिकांनी सरपंच राऊत व ग्रामपंचायतीचे आभार मानले. खारेपाटण संभाजीनगर गुरववाडी विकास मंडळातर्फे येथील महामार्गावरील निवारा शेडसह मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्‍घाटनही केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96990 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..