लोटेत कळी उमलताना उपक्रमाची मुहूर्तमेढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटेत कळी उमलताना उपक्रमाची मुहूर्तमेढ
लोटेत कळी उमलताना उपक्रमाची मुहूर्तमेढ

लोटेत कळी उमलताना उपक्रमाची मुहूर्तमेढ

sakal_logo
By

ratchl172.jpg
50637
चिपळूणः लोटे येथील सराफ विद्यालयात मुलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
------------
लोटेत कळी उमलताना
उपक्रमाची मुहूर्तमेढ
चिपळूण, ता. १७ः मुली वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल मुलींना भांबावून सोडतात, योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या बदलांशी जुळवून घेण्यास मोलाची मदत होते. हाच धागा पकडून सह्याद्री निसर्गमित्र, डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि परशुराम रुग्णालय व संशोधन केंद्राच्या सहकार्यातून कळी उमलताना या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात परशुराम रुग्णालयाचे डॉ. श्यामसुंदर भाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानावरून विनायक वैद्य यांनी मार्गदर्शन केले. सह्याद्री निसर्गमित्रतर्फे सोहम घोरपडे यांनी सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी मुलींना मासिक पाळी आणि घ्यावयाची काळजी, योगासनांचे मार्गदर्शन करण्यात आले. सर्व सहभागी मुलींना पौष्टिक खाऊ आणि सॅनिटरी पॅडचे वाटप केले. सर्व मुलींची शारीरिक तपासणी करून आवश्यक त्या मुलींच्या अतिरिक्त चाचण्या करत मार्गदर्शन केले. मुलींनी अत्यंत मोकळेपणाने सहभाग घेऊन स्वत:च्या शंका विचारून त्यांची उत्तरे मिळवली. या उपक्रमांतर्गत वयात येताना होणारे बदल यावर आधारित मार्गदर्शक माहिती पुस्तिका बनवून वितरित करण्यात येणार आहे. लोटे आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे ४० मार्गदर्शन कार्यक्रम वर्षभरात घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी परशुराम रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. दीप्ती चव्हाण, योगप्रशिक्षक डॉ. अपर्णा उत्पात, डाऊ केमिकल्सचे रितेश लाहुडकर आणि सह्याद्री निसर्गमित्रच्या व्यवस्थापकीय अधिकारी प्राची काणेकर, सागर रेडीज, राजेंद्र हुमरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97030 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..