चिपळूण ः एम. के. थिएटरमध्ये झळकणार ओंकार भोजनेचा रूपनगर के चित्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः एम. के. थिएटरमध्ये झळकणार ओंकार भोजनेचा रूपनगर के चित्ते
चिपळूण ः एम. के. थिएटरमध्ये झळकणार ओंकार भोजनेचा रूपनगर के चित्ते

चिपळूण ः एम. के. थिएटरमध्ये झळकणार ओंकार भोजनेचा रूपनगर के चित्ते

sakal_logo
By

-rat17p26.jpg ः KOP22L50732 चिपळूण ः संचालक संजय शर्मा यांना निवेदन देताना सावरी शिंदे, योगेश बांडागळे, सचिन कांबळे, मानस संसारे.
------
एम. के. थिएटरमध्ये झळकणार रूपनगर के चित्ते
संचालक शर्मांशी चर्चा ; नाटक कंपनीच्या प्रयत्नांना यश
चिपळूण, ता. १७ ः चिपळूणचा सुपुत्र, डीबीजे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ओंकार भोजने याचे बॉईज थ्री व रूपनगरके चित्ते, असे दोन मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले. चिपळूणमधील एम. के. थिएटरमध्ये बॉईज थ्री प्रदर्शित झाला; मात्र रूपनगर के चित्ते प्रदर्शित झाला नाही. या पार्श्वभूमीवर नाटक कंपनी चिपळूणच्या सदस्यांनी एम. के. थिएटरचे संचालक संजय शर्मा यांची शनिवारी भेट घेतली. चिपळूणच्या सुपुत्राचा ‘रूपनगर के चित्ते’ हा चित्रपटही प्रदर्शित करावा, अशी विनंती केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत शर्मा यांनी येत्या दोन दिवसात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने याचा बॉईज थ्री हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. यामध्ये ओंकारने नरू भोंडवे या खलनायकाची भूमिका साकारली आहे तर रूपनगर के चित्ते या चित्रपटामध्ये एका अवलिया मित्र रशिदाच्या भूमिकेत ओंकार दिसत आहे. रूपनगर के चित्ते हा चित्रपट एम. के. थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. चिपळूणच्या या सुपुत्राचा चित्रपट एम. के. थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायलाच हवा, अशी आग्रही मागणी नाटक कंपनी चिपळूणच्या सदस्यांनी केली. याला प्रतिसाद देत रविवार अथवा सोमवारी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची ग्वाही संचालक शर्मा यांनी दिली. या वेळी अभिनेता सचिन कांबळे, योगेश बांडागळे, सावरी शिंदे, मानस संसारे, श्रवण चव्हाण, आदेश कांबळी, प्रद्युम्न देवधर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97031 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..