अंगणवाडी सेविकांनी जमा केल्या फळभाज्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविकांनी जमा केल्या फळभाज्या
अंगणवाडी सेविकांनी जमा केल्या फळभाज्या

अंगणवाडी सेविकांनी जमा केल्या फळभाज्या

sakal_logo
By

rat१७p२४.jpg
५०७१३
शृंगारतळीः आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांकडून देणगी म्हणून फळभाज्या घेताना अंगणवाडी सेविका.
----------
पोषण आहाराविषयी अंगणवाडी सेविकांची जनजागृती
राष्‍ट्रीय पोषण महिना अभियान; शृंगारतळी आठवडा बाजारात रॅली; मोफत भाजीपाला वाटप
गुहागर, ता. १७ ः राष्ट्रीय पोषण महिना अभियानाची जनजागृती होण्यासाठी चिखली बीट नं. २ मधील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शनिवारी (ता. १७) आठवडाबाजारात रॅली काढली. या रॅलीतून बाजारात आलेल्या नागरिकांना पोषण आहारानिमित्त माहिती दिली तसेच बाजारातील व्यापाऱ्यांना मुलांसाठी पोषक आहार म्हणून फळे व पौष्टिक भाज्या मोफत देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडील फळे व भाज्या मोफत दिल्या.
१ ते ३० सप्टेंबर हा महिला राष्ट्रीय पोषण महिना अभियान अंगणवाड्यांवर राबवले जात आहे. या अभियानामधून मुलांना पूरक पोषण आहार देण्याबरोबरच पालकांमध्येही या आहाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. लहान मुलांना कुपोषणमुक्त, सुदृढ बनवण्यासाठी रोजच्या आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे. हा विचार सर्वांपर्यंत पोचवा म्हणून एक आगळेवेगळे अभियान चिखली बीट क्र. २ मधील ८ अंगणवाडीसेविका व २ मदतनीसांनी केले.
चिखली बीट क्र. २ अंतर्गत पाटपन्हाळे, कोंडशृंगारी, शृंगारतळी बाजारपेठ, वेळंब रोड रोशन मोहल्ला, पाटपन्हाळे गणेशवाडी, भेकरेवाडी, पिंपळवट व वाकी या ८ अंगणवाड्या येतात. येथील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पर्यवेक्षिका सी. सी. हळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आठवडा बाजारातून रॅली काढली. या वेळी सही पोषण देश रोशन, बेटी बचाव बेटी पढाव यासह पूरक पोषण आहारासंदर्भात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर ८ अंगणवाड्यांमधील मुलांना फळे व पौष्टिक भाज्या मिळाव्यात म्हणून रॅलीतील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आठवडाबाजारातील सर्व व्यापाऱ्यांची भेट घेतली. स्वखुशीने आपण मोफत फळे व भाज्या द्याव्यात, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना व्यापाऱ्यांनी आपल्याकडील सफरचंद, केळी, पपई, पेरू, चिबूड, काकडी, मक्याची कणसे, पालेभाज्या, टॉमेटो, गाजर आदी वस्तू मोफत दिल्या.
सकाळच्या वेळात अंगणवाडीचे कामकाज करून मुलांना पोषण आहार दिल्यानंतर दुपारी १२ वाजता ही रॅली काढण्यात आली. यामध्ये श्रिया वानरकर, मनाली कोलके, सारिका हळदणकर, रियाना घारे, साक्षी रजपूत, शारदा पवार, श्रावणी वेंद्रे, स्वप्नाली कदम, राजश्री साळवी व मयुरी रांजाणे या महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97033 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..