संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

‘जनकल्याण’ची रविवारी वार्षिक सभा
राजापूरः राजापूर तालुका जनकल्याण सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी (ता. १८) शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये आयोजित केली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र शिवगण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
---------
कुणबी पतपेढीची आज वार्षिक सभा
राजापूरः येथील तालुका कुणबी सहकारी पतपेढीची वार्षिक सभा रविवारी (ता. १८) सकाळी १०.३० वाजता राजापूर नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आयोजित केली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
--------
rat१७p१९.jpg
50670
कुंभारखाणी बुद्रुकः अन्नपदार्थ प्रदर्शनाची पाहणी करताना मुख्याध्यापक अशोक कदम, सरपंच गीता सुर्वे आदी.
------------
कुंभारखाणी शाळेत पोषण महिना साजरा
आरवली ः कुंभारखाणी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्र. एकमध्ये राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला. महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने समाजात जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून शाळेत विविध कडधान्ये, रानटी भाजीपाला आदींच्या पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याची पाहणी सरपंच गीता सुर्वे, माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अशोक कदम, स्नेहा सुर्वे, दीक्षा वनगे, रघुनाथ वळवी, पालशेतकर आदींनी केली. मुख्याध्यापिका दरेकर यांनी स्वागत केले.
..........
भाजपच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन भाजप युवा मोर्चामार्फत केले होते. या शिबिरासाठी ठाणे शहर मतदार संघाचे आमदार संजय केळकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. दोन ऑक्टोबरपर्यंत साजऱ्या होणाऱ्या सेवा पंधरवड्याचे उद्घाटन रक्तदान शिबिराने करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्याचा पुढाकार घेतला. सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत रक्तदान शिबिर सुरू होते. रक्तदाते स्वयंप्रेणेने येत होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, सरचिटणीस बाबू सुर्वे, सरचिटणीस प्रवीण देसाई, प्रमोद खेडेकर, सोनाली आंबेरकर, नितीन जाधव, पमू पाटील यांनी परिश्रम घेतले. सागर नांदगावकर, सुरेंद्र भोसले, चेतन बारगुडे, रोशन नाईक, मिलिंद वैद्य, विद्याधर पेडणेकर, सोहम खानविलकर, दिगंबर कुर्टे, सरदार शेख, मनीष सनगरे, वर्षा ढेकणे, महेश पालकर, विनोद पारेख, धनंजय नाईक, निंबाराम देवासी, हिरा देवासी, अमर खान, संतोष शर्मा, अखिलेश गुरव, सचिन सुराणा, उदय गोवळकर, मयुरेश शेवडे, वेदांग जोशी, सुनील धुळप, हर्षद सोहनी, अमर कीर आदी ४१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
---------------------
फणसू कॉलेजमध्ये वह्या वाटप
गावतळेः मानवाधिकार तसेच महिला बालविकास रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील धुमाळ आणि मंडणगड तालुका प्रतिनिधी अल्पेश सकपाळ यांनी १४ सप्टेंबरला दापोली तालुक्यातील फणसू येथील (कै.) मेजर नारायणराव कदम ज्युनियर कॉलेजमधील बारावीतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. धुमाळ यांनी संगठनेच्या कार्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला उपस्थित फणसूचे तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम राणे, खेममानाई सोसायटीचे व्यवस्थापक रमेश भागणे, फणसू ग्राममंडळाचे सचिव संतोष करंजकर उपस्थित होते.
--------------
शासनमान्य ब्युटीपार्लर प्रशिक्षण सुरू
रत्नागिरी ः महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण वर्ग व सजिली ब्युटीपार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य ब्युटीपार्लर प्रशिक्षण सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आय ब्रो, ब्लिच, फेशियल, वॅक्सिंग, हेअर कट, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग आदीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या वर्गाकरिता जेलरोड येथील सजिली क्लासेस येथे नावनोंदणी करावी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97035 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..