प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प
प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प

प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प

sakal_logo
By

rat१७p५.jpg
५०६४२
रत्नागिरी : समुद्रकिनारा स्वच्छता अभियानात मांडवी येथील मुख्य कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि रत्नागिरीकर. (छायाचित्र - कांचन मालगुंडकर)
rat१७p६.jpg
५०६४३
स्वच्छता अभियानाचे उद्घाटन आकाशात फुगे उडवून करताना जिल्हाधिकारी डॉ. पाटील, आमदार संजय केळकर आदी.
rat१७p७.jpg ः
५०६४४
कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील.
rat१७p८.jpg
५०६४५
स्वच्छतेची शपथ घेताना विद्यार्थी, एनसीसी, एनएसएसचे छात्र.
rat१७p९.jpg
५०६४६
स्वच्छता करण्यासाठी सरसावले जिल्हाधिकारी डॉ. पाटील, संतोष पावरी, राजीव कीर आदी.
rat१७p१२.jpg
L५०६४१
पहिल्या छायाचित्रात पांढरा समुद्र येथे स्वच्छता करताना विद्यार्थी, दुसऱ्या छायाचित्रात मिऱ्या शिवलकरवाडी येथे कचरा गोळा करताना ग्रामस्थ. (छायाचित्रे - मकरंद पटवर्धन)
------------------
प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प
जिल्हाधिकारी : मांडवी समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, ता. १७ ः प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे त्यातील सूक्ष्म घटक आपल्याला घातक आहेत. विद्यार्थी व नागरिकांनी आजपासून प्लास्टिकचा वापर कमी करेन, असा संकल्प करावा. प्लास्टिक टाळावे कारण, कचरा वाढत जातोय. रासायनिक खते शेतातून नदी, समुद्रात पोहोचतात. त्यामुळेही समुद्रात प्रदूषण होत आहे. तिथल्या प्राण्यांचे जीवन धोक्यात आले असून आपले जीवन धोक्यात येऊ नये म्हणून जगा आणि जगू द्या या तत्वाने वागावे लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
सागरी सीमा मंच (कोकण प्रांत), जिल्हा प्रशासन, तटरक्षक दल, मांडवी पर्यटन संस्था आदींच्या विद्यमाने आयोजित सागरी स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, एखादी संस्था हाक देते आणि तिला हजारो लोक प्रतिसाद देतात, ही गोष्टच आमुलाग्र बदल घडवणारी आहे. रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आपण घर स्वच्छ ठेवतो; पण घराबाहेरील घर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागणार आहेत. मानवनिर्मित कचऱ्यामुळे सूक्ष्मापासून महाकाय जीवांना त्रास सहन करावा लागतोय. सागर परिसंस्थेत आपण प्रदूषण करत आहोत. त्याकरिता प्लास्टिकचा भस्मासुराचा अंत केला पाहिजे.
ठाण्याचे आमदार संजय केळकर, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर शत्रूजित सिंग, अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड डी. एस. चंद्रशेखर, पर्यावरण संरक्षण गतीविधी कोकण प्रांतसंयोजक उदय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, मांडवी पर्यटनसंस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, रा. स्व. संघाचे दक्षिण रत्नागिरी कार्यवाह डॉ. सप्रे, पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर उपस्थित होते.
आमदार केळकर म्हणाले, स्वच्छतेची चळवळ लोकसहभागातूनच यशस्वी होणार आहे. आपला परिसर आणि किनाऱ्यावर हे अभियान करायचे आहे. आजचा दिवस साजरा करतोच आहोत. पुढच्या काळातही मी माझे घर, परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करीन. एक दिवस नाही तर दररोज हा संस्कार माझ्या अंगी बाणवेन, असा संकल्प करूया. या वेळी शत्रूजित सिंग यांनीही मार्गदर्शन केले. सागरी सीमामंच प्रांत संयोजक संतोष पावरी यांनी सांगितले, सागरी मंचाच्या कार्याची माहिती देताना या कार्यक्रमांतून देशभक्ती जागृत करण्याचे काम मंच करत आहे. राजीव कीर यांनी सर्वांना किनारपट्टी स्वच्छतादिनाची शपथ दिली. त्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.
-------------
चौकट
७५ ठिकाणी उपक्रम
जिल्ह्यात जयगड, जैतापूर, नांदीवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिर्‍या, पांढरा समुद्र, मांडवी, भाट्ये, कसोप कुर्ली, वायंगणी, रनपार बीच, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, वेत्ये, आंबोळगड, जैतापूर, साखरीनाटे, वेसवी, बाणकोट, उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर हर्णै-पाज, लाडघर, लखडतर वाडी, बुरोंडी, दाभोळ, तरीबंदर, वेलदुर, असगोली, पालशेत, बुधल, बोर्‍या, कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरी आगर, हेदवतड, काताळे नवानगर कुडली येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
-------------
चौकट
स्वच्छता अभियानातील सहभाग...
*४ हजार ६०० जणांचा सहभाग
*३३ शिक्षणसंस्था
*२३ सामाजिक संस्था
*५ उत्सव मंडळे
*३५ धार्मिक संस्था
*१० गाव भाग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97036 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..