सावंतवाडी पोलिसांच्या बाप्पांचे आज विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी पोलिसांच्या 
बाप्पांचे आज विसर्जन
सावंतवाडी पोलिसांच्या बाप्पांचे आज विसर्जन

सावंतवाडी पोलिसांच्या बाप्पांचे आज विसर्जन

sakal_logo
By

सावंतवाडी पोलिसांच्या
बाप्पांचे आज विसर्जन
सावंतवाडी, ता. १७ ः सावंतवाडी पोलिस ठाणे वसाहतीच्या गणपती मंदिरातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन उद्या (ता. १८) एकोणिसाव्या दिवशी होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. यावर्षी गणपती मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. उद्या दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी ५ वाजता मिरवणूक काढून विसर्जन होणार आहे.
-------------
ताडपत्रीपासून १३६
शेतकरी वंचित
कणकवली, ता. १७ ः पंचायत समिती सेसमधून कृषी खात्यांतर्गत २०२०-२१ साठी शेतकर्‍यांकरिता ताडपत्री योजना राबविली होती. तसेच लाभार्थी ठरवून यादी मंजूर झाली होती. लाभार्थ्यांनी खरेदीच्या पावत्या आपल्या कार्यालयाकडे सादर केल्या होत्या;परंतु या लाभार्थ्यांना पंचायत समिती सेस निधी मिळाला नाही, असे सांगण्यात येते. अजून १३६ लाभार्थी लाभापासून वंचित असून याची दखल अद्याप आपल्याकडून घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमधून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. संबंधितांचे अनुदान त्वरित जमा होण्याच्यादृष्टीने उचित कार्यवाही व्हावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
------------------
निबंध स्पर्धेत
दिव्याचे यश
कुडाळ, ता. १७ ः साळगाव येथे आयोजित कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नं. १ शाळेची विद्यार्थिनी दिव्या आंगणे (सातवी) हिने निबंध स्पर्धेत सहावी ते आठवी गटातून (विषयः पर्यावरण संवर्धन काळाची गरज) तृतीय क्रमांक पटकावला. तिचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटी, सर्व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.
----------------
गणेशोत्सवानिमित्त
सिंधुदुर्गनगरीत कार्यक्रम
कुडाळ, ता. १७ ः सिंधुप्रतिष्ठा पोलिस वसाहत, सिंधुदुर्गनगरी येथील गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. १८) सकाळी १० वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता टी-ट्वेन्टी डबलबारी भजन सामना बुवा उदय पारकर (कासार्डे) विरूद्ध सागर जोईल (कातवण) यांच्यात होणार आहे. सोमवारी (ता. १९) रात्री ८ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते स्पर्धांचे बक्षीस वितरण, रात्री ९ वाजता डी. डी. आर. ग्रुपचा डान्स शो, मंगळवारी (ता. २०) दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक होणार आहे. उत्सव कालावधीत दररोज दुपारी १२ वाजता व रात्री ८ वाजता श्रींची आरती होईल.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97043 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..