मडुरावासीय वीज समस्येने त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुरावासीय वीज समस्येने त्रस्त
मडुरावासीय वीज समस्येने त्रस्त

मडुरावासीय वीज समस्येने त्रस्त

sakal_logo
By

मडुरावासीय वीज समस्येने त्रस्त

अधिकाऱ्यांबाबत नाराजी; बिल न भरण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः असुविधांशी सामना करणारे मडुऱ्यातील नागरिक वीज समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. अखंडित वीजपुरवठा करण्यास महावितरणला अपयश येत असल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. गेले तीन दिवस गावात विजेचा लपंडाव सुरू असून स्थानिकांच्या वारंवार तक्रारींनंतरही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराबाबत मडुरावासीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मडुरा गावात गेले तीन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वीज गुल झाल्यानंतर वायरमन, लाईनमन तसेच सहायक अभियंत्यांचा फोनसुद्धा बंद होतो. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे विजेची अनेक कामे रेंगाळली आहेत अन् तीन दिवस काळोखात रहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता घुरे व बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांनी जुलै महिन्यात ग्रामस्थांनी छेडलेल्या उपोषणावेळी सर्व वीज समस्या मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते; मात्र हे आश्वासन हवेतच विरले. गेले तीन दिवस गावात वीजपुरवठा खंडित होत असून ग्रामस्थांना काळोखात रहावे लागत आहे. याचा फटका विद्यार्थी, व्यावसायिक तसेच गृहिणींना बसत आहे. झाडे-झुडपे तोडण्यासाठी ग्रामस्थ कायम सहकार्य करतात; परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अंधारात रहावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया परब यांनी दिली.
--
कोट
वीजबिले वेळेवर भरत असूनही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे यापुढे एकही बिल भरणार नाही.
- प्रवीण ऊर्फ पिंट्या परब, युवासेना सातार्डा उपविभागप्रमुख

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97044 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..