पोर्ट अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ट अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक
पोर्ट अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक

पोर्ट अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक

sakal_logo
By

पोर्ट अधिकाऱ्याची
ऑनलाइन फसवणूक
बँकखात्यातून अज्ञाताने काढले ७६ हजार
गुहागर, ता. १७ः कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा कॉल नाही, बँकेची माहिती कोणाला शेअर केलेली नाही किंवा कोणत्याही बँकेचा ओटीपी आलेला नसताना अंजनवेल येथील कोकण एलएनजी पोर्ट मॅनेजर असलेल्या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञाताने ऑनलाइन ७६ हजार ७३४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (ता. १५) घडली. या प्रकरणी गुहागर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गॅस आणि विद्युत प्रकल्पातील कोकण एलएनजी पोर्ट मॅनेजर दिलीपकुमार रामजन्म सिंह (वय ४१, सध्या रा. ब्राह्मणवाडी, अंजनेवल) येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते मार्च २०२१ पासून नोकरीत आहेत. त्यांनी अॅक्सिस बँक (साक्ची, जि. जमशेदपूर, राज्य झारंखड) येथे सुमारे २०१२ साली एनआरआय सेविंग अकाउंट ओपन केले आहे. १६ सप्टेंबर २०२२ ला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते झोपेतून उठले व नेहमीप्रमाणे मेल अकाउंट ओपन करून ऑफिसचे मेल चेक करत असताना त्यांना अॅक्सिस बॅंकेचे मेल प्राप्त झाले. या अकाउंटमधून ७६ हजार ७३४ रुपये हे डेबिट झाल्याचे लक्षात आले. तसेच त्यांनी अॅक्सिस बँक कस्टमर केअर व ऑनलाइन अॅप्लिकेशनद्वारे डेबिट झालेल्या पैशांची स्लीप काढली. त्यानंतर होम ब्रांचमध्ये ७६ हजार ७३४ रुपयांचे झालेल्या ट्रान्जॅक्शनबाबत प्रकार सांगितला व अकाउंट ब्लॉक करण्यास सांगितले. १५ ते १६ या कालावधीत बँक स्टेटमेंटप्रमाणे त्यांच्या अॅक्सिस बँक अकाउंटमधून ७६ हजार ७३४ रुपये कट झालेले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97071 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..