रत्नागिरी-मुख्यमंत्री दौर्‍यावेळी निष्ठावंत कोण यावर बोलेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-मुख्यमंत्री दौर्‍यावेळी निष्ठावंत कोण यावर बोलेन
रत्नागिरी-मुख्यमंत्री दौर्‍यावेळी निष्ठावंत कोण यावर बोलेन

रत्नागिरी-मुख्यमंत्री दौर्‍यावेळी निष्ठावंत कोण यावर बोलेन

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat17p30.jpg- रत्नागिरी ः पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत.
----------

मुख्यमंत्री दौऱ्यावेळी निष्ठावंत कोण, यावर बोलेन

उद्योगमंत्री उदय सामंत; रत्नागिरीची कॉर्नर सभा म्हणजे आदित्य यांचा अपमानच

रत्नागिरी, ता. १७ ः जिल्ह्यातील कॉर्नर सभेला चारशे खुर्च्या आणि हजारभर माणसे होती. आदित्य ठाकरेंसारख्या नेत्याला आणून अशी कॉर्नर सभा घेणे हा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेच्या संवादनिष्ठा यात्रा मेळाव्याची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या‍वेळी व्यासपीठावरून कोण, किती आणि कसे निष्ठावंत आहेत, हे बोलेन, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी आरोप केलेत, त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘उद्योग खात्यात यापूर्वी काय झाले ते मी शोधून काढणार आहे. तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी वेदांत का गेला त्याची उत्तरे दिली पाहिजेत. डाऊ संदर्भात त्यांची काय चर्चा झाली, हे मी शोधणार आहे. महाविकास आघाडीमुळेच वेदांत अन्य राज्यात गेला. युवा पिढीचे नुकसान मागील सरकारनेच केले. हाय पॉवर कमिटीची बैठक होत नाही, तोपर्यंत प्रकल्पाला पॅकेज किती द्यायचे, हे ठरत नाही. गुजरातने मे महिन्यात पॅकेज दिले तर त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच पॅकेज जाहीर केले होते; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
आम्हाला अपेक्षित होते की आदित्य ठाकरे रिफायनरीविषयीचे धोरण जाहीर करतील. लोकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्या मागे उभे राहू हे राजकीय वक्तव्य आहे. महाराष्ट्रातील, कोकणातील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे. प्रकल्प झाला पाहिजे की नाही यावर बोलले पाहिजे. बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे न्यायचे की नाही, शिंदे यांची भाजपबरोबर झालेली युती योग्य की अयोग्य यावर त्यांनी भाष्य केले पाहिजे. आमच्या मतदारसंघात येऊन टवाळकी करून गद्दार असल्याची भाषणे करून काही होणार नाही. लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांचीच क्रेझ आहे. लोक स्वतःहून सांगत आहेत, की तुम्ही केलेले धाडस हिंदुत्व वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्याविरोधात कितीही भाषणे करा, लोक मतदानातून जागा दाखवतील.
-------------
चौकट

मी राजकीय नियम पाळतो

सामंत म्हणाले, ‘राष्ट्रवादीतून बाहेर पडलो तरी नेत्यांवर टीका केली नाही. मी राजकीय नियम पाळतो. आताही मी उद्धव ठाकरेंवर कधीच बोललो नाही. विकासकामे करून निवडणूक जिंकून माझी ताकद दाखवेन. शिवीगाळ करून पक्ष वाढत नाही. जे माझ्यावर टीका करत आहेत, त्यांनीच एकेकाळी आदित्य ठाकरेंच्या आवाजावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंचा हात वर जात नाही, असे आरोप करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये,’ असे ठणकावत मंत्री सामंत यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिले. अनंत गीते यांना माहितीये ते पुन्हा खासदार होणार नाहीत. त्यामुळे ते आरोप करत फिरत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच गीतेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते; परंतु मी कुणाच्याही आरोपांचा जास्त विचार करत नाही. त्यांच्या बोलण्याने माझी मते वाढतील.
---
चौकट

उद्योजकांशी स्वतः बोलणार

राज्यातील १२३ प्रकल्पांना तात्पुरती स्थगिती दिली होती. दोन ते तीन दिवसांत ती उठवली जाईल. संबंधित उद्योजकांशी मी स्वतः बोलणार आहे. त्यांना कोणत्या सवलती देता येतील यावर चर्चा करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97093 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..