झाड दुचाकीवर पडून महिला गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाड दुचाकीवर पडून महिला गंभीर
झाड दुचाकीवर पडून महिला गंभीर

झाड दुचाकीवर पडून महिला गंभीर

sakal_logo
By

50779
दोडामार्ग ः महिलेला उपचारासाठी नेताना ग्रामस्थ.
50780
दोडामार्ग ः रस्त्यात कोसळलेले झाड.

झाड दुचाकीवर पडून महिला गंभीर

दोडामार्गातील घटना; वाहतूक दीड तास ठप्प, विद्यार्थ्यांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ : दोडामार्ग-तिलारी मार्गावर आज सकाळी पावणेसातच्या दरम्यान रस्त्याशेजारील झाड पडल्याने दुचाकीवरील एक महिला गंभीर जखमी झाली. तर झाड बाजूला काढण्याची व्यवस्था नसल्याने तास-दीडतास वाहतूक ठप्प झाली. येथील गणेश विसर्जन स्थळ ते केळीचे टेंब येथील उगाडेकर यांच्या घरानजीकच्या वळणावर हा अपघात झाला.
रस्त्यात पडलेले झाड काढण्यास उशीर झाल्याने गोव्यात कामाला जाणाऱ्या युवक-युवतींचे आणि दोडामार्ग व गोव्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. वस्तीच्या अनेक गाड्या यावेळी अडकून पडल्या. सुदैवानै कोल्हापूरला जाणारी एसटी गेल्यानंतर झाड पडल्याने त्या गाडीच्या प्रवाशांचा खोळंबा टळला. तर काहींनी कालव्यावरून प्रवास करत दोडामार्ग व साटेली भेडशी गाठली.
रस्त्यात पडलेले झाड हटवण्यासाठी जवळपास कुणाकडे कटर उपलब्ध झाला नाही. तसेच बांधकाम विभागाला तिथून काहींनी फोन लावला, मात्र कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे बराच वेळ झाड रस्त्यात पडून होते. एका बाजूने झाड बाजूला करून थोडा रस्ता मोकळा करण्याच्या उद्देशाने तिथे उपस्थित असलेले एसटी चालक-वाहक, कामावर जाणारे तरुण, स्थानिक ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली; पण झाड काही जाग्यावरून हालले नाही. अखेर नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य स्थानिक युवकांनी मिळून झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला.
..............
अपघात भयावह
पिकुळे येथील रुपाली गवस आपल्या नातेवाईकांसोबत दोडामार्गला येत होत्या. त्यांची दुचाकी पास होताना झाड त्यांच्या डोक्यावर कोसळल्याने त्या रस्त्यात कोसळल्या. दुचाकी चालकाच्या ती घटना लक्षात येईपर्यंत त्या वीस-तीस फूट फरफटत गेल्या होत्या. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्या विव्हळत होत्या. अर्ध्या-पाऊण तासांत १०८ रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात नेले व तेथून गोवा येथे पाठवल्याची माहिती मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97113 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..