रत्नागिरीत रविवारी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत रविवारी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा
रत्नागिरीत रविवारी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

रत्नागिरीत रविवारी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

sakal_logo
By

जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने (कै.) अनिल कानविंदे स्मृती जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी चेस अॅकॅडमीमार्फत रविवारी (ता. १८) केले आहे. आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेत फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील १३ वर्षांखालील वयोगटातील (१ जानेवारी २००९ किंवा त्यानंतरची जन्मतारीख असलेली) मुले व मुली सहभागी होऊ शकतात. प्रत्येकी दोन मुलांची व दोन मुलींची निवड महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता करण्यात येईल तसेच मुले-मुलींमधून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धा नाचणे रोड पॉवरहाऊसजवळील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे होणार आहे. खेळाडूंनी सकाळी १० वा. उपस्थित राहायचे आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्यासाठी चैतन्य भिडे, विवेक सोहनी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97117 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..