देवबागमध्ये 28 ला ''कौशल्य वर्तन'' कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवबागमध्ये 28 ला ''कौशल्य वर्तन'' कार्यशाळा
देवबागमध्ये 28 ला ''कौशल्य वर्तन'' कार्यशाळा

देवबागमध्ये 28 ला ''कौशल्य वर्तन'' कार्यशाळा

sakal_logo
By

L50788
मालवण ः कार्यशाळेची माहिती देताना अध्यक्ष बाबा मोंडकर.


देवबागमध्ये २८ ला ‘कौशल्य वर्तन’ कार्यशाळा

बाबा मोंडकर ः न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन

मालवण, ता. १७ : कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसाय नव्याने उभारी घेत आहे. येथील पर्यटन व्यावसायिकांना मजबुती देण्याच्या दृष्टीने पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी बुधवारी (ता.२८) देवबाग येथील समर्थ सिनेमागृह येथे अतिथी गृह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित केली आहे. यावेळी न्याहरी निवासधारकांची शासनाच्या पोर्टलवर नोंदणी होण्यासाठी मार्गदर्शन व प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यशाळेस केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, भारत पर्यटनचे संचालक व्यंकटेशन दत्तात्रेयन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील हॉटेल रुचिरा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, मेघा सावंत, विद्या फर्नांडिस, प्रवीण रेवंडकर आदी उपस्थित होते.
मोंडकर म्हणाले, "येथील पर्यटन व्यावसायिकांना मजबुती देण्यासाठी शासनाकडून काही कार्यक्रम राबविण्यात यावेत, यासाठी महासंघाकडून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या अंतर्गत पर्यटन दिनाचे औचित्य साधून २८ ला देवबाग येथे न्याहरी निवास धारकांसाठी अतिथी गृह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस भारत पर्यटनच्या माजी संचालक नीला लाड, उपसंचालक जगदीप ठोंबरे, भावना शिंदे, खादी ग्रामोद्योगचे जिल्हा संचालक आनंद कर्णिक, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महाराष्ट्र टुर ऑपरेटर असोसिएशनचे उदय कदम, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे सचिव नकुल पार्सेकर, महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष अविनाश सामंत, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, वेंगुर्ले अध्यक्ष महेश सामंत, आयएचएम गोवा येथील तज्ज्ञ मार्गदर्शक अभिषेक भोसले, उमेश बोडके आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रथम नोंदणी करणाऱ्या १०० व्यावसायिकांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल."
या कार्यशाळेत महासंघातर्फे घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे. यातील फोटोग्राफी स्पर्धेतील विजेते अनुक्रमे संजय खराडे, शैलेश दाभोलकर, वैभव केळकर, केक स्पर्धा-प्रज्ञा लुगेरा, शेफाली महाडिक, साहिल सावंत, उत्तेजनार्थ-सिमरन सावंत, सुप्रिया पेंडूरकर यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मोंडकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97118 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..