मळगावच्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगावच्या त्या तरुणाची
मृत्यूशी झुंज अपयशी
मळगावच्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी

मळगावच्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी

sakal_logo
By

50792 - महेंद्र रेडकर

मळगावच्या त्या तरुणाची
मृत्यूशी झुंज अपयशी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः म्हापसा (गोवा) येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या मळगाव-रेडकरवाडी येथील महेंद्र मोहन रेडकर (वय ३३) यांचा आज गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघात १३ सप्टेंबरला झाला होता. दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
ते, सुहाना मसाला कंपनीचे गोवा विभागप्रमुख होते. ते १३ सप्टेंबरला सकाळी दुचाकीने म्हापसा येथे गेले होते. म्हापसा न्यायालयासमोरील उतारावरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ते रस्त्यावर कोसळले. बस चालकाला बसवर ताबा मिळवता न आल्याने त्यासोबत ते फरफटत जाऊन गाडीचे पुढील चाक त्यांच्या अंगावर चढले.
अपघातानंतर तशाच अवस्थेत त्यांनी याची कल्पना आपल्या म्हापसा येथील कंपनीच्या सहकाऱ्यांना दिली. सहकाऱ्‍यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना म्हापसा येथील अजिलो रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविले. तेथे बुधवारी रात्री त्यांच्या पोटावर अवघड अशी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मात्र ते शुद्धीत आले नाहीत. गेले तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सुहाना मसाला ब्रँडच्या गोवा व सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सेल्समन ते गोवा वितरणप्रमुख असा त्यांचा प्रवास होता.

आई पाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी अंत
रेडकर यांच्या आईचे महिनाभरापूर्वी म्हणजे १० ऑगस्टला मडगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यानंतर महिनाभरातच मुलाचाही मृत्यू झाल्याने रेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्र यांच्या मागे पत्नी, दीड वर्षाची मुलगी, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. महेंद्र कर्ते होते. सिंधुमित्र फाउंडेशनचे कार्यकर्ते भगवान ऊर्फ दाजी रेडकर यांचे ते बंधू होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97127 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..