सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली
सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली

सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली

sakal_logo
By

सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली
चिपळुणात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय; १७ वर्षे नुतनीकरणासाठी आहे बंद
चिपळूण, ता. १७ ः शहराचे वैभव असलेले आणि १७ वर्षापासून नुतनीकरणाच्या नावाखाली शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद आहे. ते सुरू होण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यानुसार याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवर चौकशी सुरूच राहील. मात्र तोपर्यंत यातून मार्ग काढत सांस्कृतिक केंद्र लवकरात जनतेसाठी खुला करावे, त्यासाठी लागेल ते सहकार्य सर्वच राजकीय पक्ष देतील, अशी ग्वाही शनिवारी (ता. १७) येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिका प्रशासनाला देण्यात आली.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र २००५ च्या महापुरात उदध्वस्त झाले. त्यानंतर २०१७ पासून त्याच्या नुतनीकरणाला सुरवात झाली. २०२० मध्ये नुतनीकरणाच्या कामाला वेग येऊन २०२१ मध्ये त्याला अंतिम स्वरूप आले. मात्र गतवर्षीच्या महापुरात पुन्हा त्याचे नुकसान झाले. एकूणच या केंद्राच्या नुतनीकरणात प्रचंड राजकारणाबरोबरच गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने चौकशी सुरू झाली. अनेकांनी केंद्र खुले होण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाले. मात्र ते खुले न झाल्याने स्थानिक राजकारणी आणि लोकप्रतिनिधींवर जनतेचा रोष निर्माण झाला. यातूनच सर्वपक्षीय बैठक घेऊन केंद्र सुरू करण्याच्यादृष्टीने पुन्हा प्रयत्न सुरू झाले.
शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, भाजपाचे शहराध्यक्ष आशिष खातू, विजय चितळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, तसेच शिरीष काटकर, इनायत मुकादम, अविनाश केळस्कर, श्रीराम खरे, रिहाना बिजले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नगर अभियंता परेश पवार, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांची संयुक्त बैठक झाली.
माजी आमदार कदम यांनीही निकम यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवताना आता झाले तेवढे पुरे, प्रशासनाने यावर योग्य तो मार्ग काढून केंद्र खुले करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले. उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनीही केंद्र खुले करावे, त्यासाठी लागेल ते सहकार्य सर्वपक्षीय आम्ही देऊ अशी ग्वाही दिली.
दरम्यान, काही माजी नगरसेवकांनी निविदा प्रक्रिया, पूर्ण आणि अपूर्ण कामे, नव्याने कामे कशी आणि कुणाला देणार, झालेल्या कामांची बिले कशी काढणार अशी प्रश्नांची सरबत्ती केली. यावर मुख्याधिकारी शिंगटे यांनीही काही तांत्रिक गोष्टी स्पष्ट केल्या. शिवाय आता जरी पुढील प्रक्रिया सुरू केली तरी केंद्र खुले करण्यासाठी मार्च उजाडेल असे सांगितले.

कोट
कोट्यवधी रुपये खर्चून केंद्राचे नुतनीकरण केले आहे. अजून काहीकाळ हे केंद्र बंद राहीले तर खर्च केलेला पैसाही वाया जाणार आहे. आपण नव्याने सांस्कृतिक भवन उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. तोपर्यंत केंद्राच्या नुतनीकरणाविरोधात झालेल्या तक्रारी, सुरू असलेली चौकशी पुढे सुरूच राहील. मात्र तोपर्यंत काम जर पूर्णत्वास गेले असेल तर केंद्र खुले होणे हे गरजेचे आहे.
- शेखर निकम, आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97129 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..