निकृष्ट साहित्याचे लोकार्पण केलेच का? ः चिंदरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकृष्ट साहित्याचे लोकार्पण 
केलेच का? ः चिंदरकर
निकृष्ट साहित्याचे लोकार्पण केलेच का? ः चिंदरकर

निकृष्ट साहित्याचे लोकार्पण केलेच का? ः चिंदरकर

sakal_logo
By

निकृष्ट साहित्याचे लोकार्पण
केलेच का? ः चिंदरकर

शिवसेनेने केलेल्या आरोपांना उत्तर

मालवण, ता. १७ : पालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य जर निकृष्ट दर्जाचे होते, तर आमदार वैभव नाईक यांनी त्याचे लोकार्पण का केले? त्यांना हे साहित्य अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उद्‍घाटन दाखवून आणखी २५ लाख उकळायचे होते का? असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उपस्थित करत याचे उत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे, असे म्हटले आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार नीलेश राणेंवर केलेल्या टीकेला चिंदरकर यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, व्यायामशाळेतील साहित्य जर निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले, तर आमदारांनी त्याचे लोकार्पण का केले? हे साहित्य त्यांना अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उद्‍घाटन दाखवायचे होते का? त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे करून सत्तेचा वापर स्वतःसाठी करायचा एवढंच माहित असलेल्यांनी प्रशासनातील गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. राहिला प्रश्न देवबाग, तळाशील बंधाऱ्याचा, तर क्रोसेक्शन सर्वेसाठी आवाज उठविल्यानंतर ते पैसे भरले. तो सर्व्हे करण्यासाठी काय पाठपुरावा केला होता का, याचे ज्ञान नाही आणि प्रशासनाच्या गोष्टीवर बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे. जोपर्यंत क्रोसेक्शन सर्व्हे होत नाही, तोपर्यंत ते काम होत नाही, हे सुद्धा माहीत नाही? देवबाग बांधार्‍यासासाठी नारायण राणे यांनी १ कोटीचा निधी दिला. तो सत्तेचा गैरवापर करून मते विरोधात जाण्याच्या धास्तीने तिकडे कोलदांडा घालण्याचे काम कोणी केले, त्याच उत्तर द्यावे. आज रस्त्यांची दुरवस्था आहे, त्याला जबाबदार कोण? तुमच्या सत्तेच्या कारकिर्दीत केलेले रस्ते एका वर्षात निखळून पडले. जिओ ट्यूब वाहून गेले. आता सत्ता भाजप व अधिकृत सेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शांतच बसावे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97130 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..