वेंगुर्ले किनाऱ्यावर डांबरसदृश गोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले किनाऱ्यावर डांबरसदृश गोळे
वेंगुर्ले किनाऱ्यावर डांबरसदृश गोळे

वेंगुर्ले किनाऱ्यावर डांबरसदृश गोळे

sakal_logo
By

50761
वेंगुर्ले ः समुद्र किनाऱ्यावर पसरलेले डांबरसदृश गोळे.

वेंगुर्ले किनाऱ्यावर डांबरसदृश गोळे
वेंगुर्ले ः येथील समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डांबरसदृश गोळे आढळून येत आहेत; मात्र हा प्रकार विजयदुर्ग समुद्रात बुडलेल्या तेलवाहू बोटीमुळे झालेला नाही. तसेच किनाऱ्यावरील पाण्यावर तेलाचा तवंग दिसत नसल्याची माहिती मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिली. डांबरसदृश पदार्थामुळे मच्छिमारांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणारे ‘पार्थ’ हे तेलवाहू जहाज सिंधुदुर्ग जिह्यातील विजयदुर्गजवळ बुडाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या बुडालेल्या बोटीतील तेलामुळेच किनाऱ्यावर डांबरासारखे काळे थर दिसत असल्याचे बोलले जात होते; परंतु याबाबत स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला असता दरवर्षी असे काळे थर येत असल्याचे त्यांनी सांगितले. खोल समुद्रातून वाहून येणाऱ्या ‘क्रुज ऑइल’ची गळती होत असते. त्यामुळे ते काळसर ऑईल पाण्याबरोबर वाहत किनाऱ्यापर्यंत येते. समुद्राचे खारे पाणी आणि उष्णता यांच्यामुळे या ऑईलचे डांबरासारखे गोळे किनाऱ्यावर दिसतात. यापासून कोणताही धोका नसल्याचे तांडेल यांनी सांगितले. वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरस्कर यांनी याला दुजोरा दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97137 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..