मडुऱ्यात वीज अधिकारी धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुऱ्यात वीज अधिकारी धारेवर
मडुऱ्यात वीज अधिकारी धारेवर

मडुऱ्यात वीज अधिकारी धारेवर

sakal_logo
By

50810
मडुरा ः सहायक अभियंता अनिल यादव यांना जाब विचारताना ग्रामस्थ.

मडुऱ्यात वीज अधिकारी धारेवर

ग्रामस्थ आक्रमक ः विजेच्या खोळंब्याबाबत विचारला जाब

बांदा, ता. १७ ः मडुरे गावात सलग तीन दिवस वीजपुरवठा गायब असल्याने बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना ग्राहकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. थातूरमातूर उत्तरे देऊन विषयाला बगल देणाऱ्या यादव यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका, असा इशाराही दिला.
मडुरा लाईनमन पांढरभिसे गावातून जात असताना संतप्त ग्रामस्थांनी त्यांना घेरले. गेले चार दिवस वीजपुरवठा बंद असताना झोपा काढता का, असा सवाल ग्रामस्थांनी केला. प्रत्येकवेळी अधिकाऱ्यां‍कडे बोट दाखविल्याने जोपर्यंत अधिकारी येत नाही, तोपर्यंत लाईनमन यांना न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरा अभियंता यादव मडुऱ्यात दाखल झाले. या वेळी संतप्त ग्राहकांनी प्रश्नांची सरबत्ती केली; मात्र त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात ते अपयशी ठरले. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास गावातून एकही ग्राहक वीजबिल भरणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कामुलकर, अरुण परब, पिंटो परब, अनिल शेर्लेकर, उल्हास परब, दिलीप परब, कृष्णा परब, योगेश तळवणेकर, संदेश राऊळ, दिनेश परब, बाळू गावडे, विजय परब, प्रकाश जाधव, श्रीकृष्ण भोगले, अमित परब, संतोष जाधव, रुपेश परब, अभिजित परब, गजा पेडणेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97147 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..