संघटित लढ्यातून यश निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघटित लढ्यातून यश निश्चित
संघटित लढ्यातून यश निश्चित

संघटित लढ्यातून यश निश्चित

sakal_logo
By

50819
सिंधुदुर्गनगरी ः वीज कंत्राटी कामगार मेळाव्याचे उद्‍घाटन करताना नीलेश खरात, अमर लोहार, अशोक सावंत, सागर पवार, आनंद लाड आदी.

संघटित लढ्यातून यश निश्चित

नीलेश खरात ः सिंधुदुर्गनगरीत वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः वीज कंपनी नावारुपास आणण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचा मोलाचा वाटा आहे. जो संघटनेशी एकनिष्ठ आहे, त्याच्यासाठी काम करणे आमचे कर्तव्य आहे. न्याय्य प्रश्नांसाठी एकजुटीने लढा दिल्यास यश दूर नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी आज ओरोस येथे वीज कंत्राटी वीज कामगार जिल्हा मेळाव्यात केले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गच्या वतीने (संलग्न भारतीय मजदूर संघ) जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांचा स्नेहमेळावा आज इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय ओरोस येथे खरात व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ कोषाध्यक्ष सागर पवार, केंद्रीय उपाध्यक्ष अमर लोहार, कोल्हापूर सर्कल अध्यक्ष मिलिंद कुडतरकर, सिंधुदुर्ग कामगार नेते व मार्गदर्शक अशोक सावंत, पुणे प्रादेशिक अध्यक्ष संतोष आंबट, झोन सचिव कृष्णाबच्चे पाटील, छोटू सावजी, कृष्णा सावंत, जिल्हाध्यक्ष आनंद लाड, संदीप बांदेकर, सचिन राघव, मोहन गावडे, संजय गोवेकर, एचडीएफसीचे वेदंते, नरेंद्र चव्हाण उपस्थित होते.
मेळाव्यात संघटनेची आतापर्यंची यशस्वी वाटचाल तसेच कोर्ट केसमधील संघटनेचे कामगार, सभासद यांना अंतिम सूचना, शिस्त व नियम माहिती, ''समान काम, समान वेतन'' या नवीन दाव्याबद्दल माहिती, कंत्राटदारमुक्त रोजगार याबद्दल संघटनेचे चाललेले प्रयत्न, कामगारांवर होणाऱ्या अन्यायांबद्दल मार्गदर्शन, भारतीय मजदूर संघाचे नागपूर येथे होणारे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन याबद्दल प्राथमिक माहिती देण्यात आली. लोहार, कुडतरकर, पवार यांनी मार्गदर्शन केले. आनंद लाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संघावर नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. नरेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
--
‘महाविकास’मुळे प्रश्न प्रलंबित
खरात म्हणाले की, तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने वीज कंत्राटी कामगारांचे मूलभूत प्रश्न प्रलंबित ठेवले. संघटनेने न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला, आंदोलने केली. पुणे-मुंबई पायी मोर्चा काढला. कंत्राटी कामगारांच्या हितासाठी लढा देणारा एकमेव आपला संघ आहे. भविष्यातही संघटितपणे लढा देण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. कामगार नेते सावंत यांनी, व्यक्तीपेक्षा संघटना महत्त्वाची असून ती जिवंत ठेवणे आपले सर्वांचे काम आहे, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97164 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..