सावंतवाडीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआउट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआउट’
सावंतवाडीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआउट’

सावंतवाडीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआउट’

sakal_logo
By

50823
फुलचंद मेंगडे

सावंतवाडीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआउट’

दारू, मटक्यावर कारवाई; शहरासह आंबोली, सांगेलीत मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः गेल्या चोवीस तासात आंबोली आणि सांगेली अशा दोन ठिकाणी दारू विक्री करणाऱ्यांवर, तर सावंतवाडी शहरात एका मटका घेणाऱ्यावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात येथील पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑलआउट’ राबविले. यासाठी तीन अधिकाऱ्यांसह १३ पोलिस कर्मचाऱ्यांची टीम तैनात होती. या कारवाईत सातत्य राहणार आहे, असेही मेंगडे यांनी सांगितले.
पहिली कारवाई आंबोली येथे करण्यात आली. यात गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सांगली येथील एकावर कारवाई केली. प्रसाद मायाप्पा बन्ने असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २६ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. तर दुसरी कारवाई सांगेली येथे करण्यात आली. त्या ठिकाणी दारू विक्री केल्याप्रकरणी वैशाली विजय कुडतरकर या महिलेवर कारवाई केली. तिच्याकडून २ हजार ६०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तिसरी कारवाई येथील विठ्ठल मंदिरच्या मागे असलेल्या एका स्टॉलवर करण्यात आली. यात मटका स्वीकारताना कृष्णा शंकर राऊळ याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सावंतवाडी व आंबोली येथे केलेल्या नाकाबंदीत १० वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. काही संशयित आणि सराईत आरोपींची झाडाझडती घेण्यात आली, तर काहींना समन्स बजावण्यात आले, अशी माहिती मेंगडे यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर, आनंद यशवंते, सूरज पाटील, जाधव, हर्लेकर यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97170 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..