कनेडी येथील रस्त्यावर खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी येथील
रस्त्यावर खड्डे
कनेडी येथील रस्त्यावर खड्डे

कनेडी येथील रस्त्यावर खड्डे

sakal_logo
By

वेंगुर्ले आगारास
१२ लाख उत्पन्न
वेंगुर्ले ः गणेशोत्सव कालावधीत बोरिवली, विरार, परेल, पुणे या ठिकाणी वेंगुर्ले आगारातर्फे सोडलेल्या जादा एसटींमधून १८ दिवसांत १२ लाखांचे उत्पन्न मिळाले. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली विरार, परेल, पुणे या मार्गावर बसफेर्‍यांचे नियोजन केले होते. या कालावधीत वेंगुर्ले आगाराला परतीच्या ९७ बस फेऱ्यांमधून १२ लाख ७६६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिली आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे व स्थानकप्रमुख नीलेश वारंग यांनी दिली.
--
अभियंता दिन
पणदुरात साजरा
कुडाळ ः वेताळबांबर्डे विभाग शिक्षण संचलित पणदूर प्रसारक मंडळ संचलित पणदूर तिठा येथील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. जी. कर्पे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता घन:श्याम शिरसेकर, संस्थेचे उपकार्याध्यक्ष प्रकाश जैतापकर होते. विद्यार्थी हर्षद परंब (बारावी) याने डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट उलगडला.
---
कनेडी येथील
रस्त्यावर खड्डे
कनेडी ः येथील बाजारपेठेतून नरडवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. कनेडी बाजारपेठीतील उतारावरच खड्डा पडला आहे. तर या रस्त्याच्या पुढील एका तिव्र वळणावर खड्डा आहे. गेल्या वर्षी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी हा खड्डा बुजवला होता. यंदा मात्र, सार्वजनिक बांधखाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
---------
‘पेंशनर्स’ची
आज सभा
कणकवली ः तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा उद्या (ता.१९) सकाळी साडेदहाला संस्थेच्या पेन्शनर भवन, कलमठ येथे कार्यालयात आयोजित केली आहे. पेन्शन संबंधी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष सीताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी कळविले आहे.
--
सर्जेकोटला
हरिनाम सप्ताह
मालवण : बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या शिकवणुकीप्रमाणे बेळगाव येथील श्रीहरी मंदिरातील भक्तमंडळीच्या मार्गदर्शनाखाली २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत मारुती मंदिर सर्जेकोट या ठिकाणी हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजता श्रीकृष्णप्रताप वाचन, गौळणी, भजन व प्रदक्षिणा असे कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97220 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..