पार्श्वनाथ बँकेच्या अधिकाऱ्याला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्श्वनाथ बँकेच्या 
अधिकाऱ्याला जामीन
पार्श्वनाथ बँकेच्या अधिकाऱ्याला जामीन

पार्श्वनाथ बँकेच्या अधिकाऱ्याला जामीन

sakal_logo
By

पार्श्वनाथ बँकेच्या
अधिकाऱ्याला जामीन
कणकवली,ता. १८ ः पार्श्वनाथ बँकेच्या कणकवली शाखाधिकारी किशोर गुंजीकर यांना कर्जदाराच्या ८० लाख अफरातफर व फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून जामीनावर मुक्ततेचा आदेश दिला. त्यांना २५ हजाराचा जामीन, साक्षीदारांवर दबाव आणू नये, बँकेकडे फिरकू नये आदी अटी घातल्या आहेत. त्यांच्यावतीने ॲड. विलास परब व ॲड. तुषार परब यांनी काम पाहिले. राज्य शासनाचे लेखापाल सच्चिदानंद पैलवान यांनी किशोर गुंजीकर, रोखपाल अनुश्री गावडे, कर्जदार अशोक सावंत, आर्किटेक्ट प्रथमेश सावंत यांनी संगनमताने सहकर्जदार प्रेमानंद सावंत यांची फसवणूक केली अशी फिर्याद दिली होती. त्यानुसार शाखाधिकारी व अशोक सावंत यांना एप्रिल २०२२ मध्ये पोलिसांनी अटक केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97223 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..