रत्नागिरी-सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सदर
रत्नागिरी-सदर

रत्नागिरी-सदर

sakal_logo
By

१२ सप्टेंबर रत्नागिरी १०२ वरून लोगो घेणे..

फोटो ओळी
-rat18p2.jpg ःKOP22L50868 डॉ. गजानन पाटील
-----------

शिक्षण ः लोकल टू ग्लोबल ---लोगो

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील
अभिनव अभ्यासक्रम रचना

प्रचलित शिक्षणव्यवस्थेमध्ये घोकंपट्टीला फार महत्त्वाचे स्थान होते. मुलांच्या नवनिर्मिती क्षमतेवर विशेष भर दिला जात नव्हता; पण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये यामध्ये बदल करण्यात आला आहे. घोकंपट्टीद्वारे करण्यात येणारे अध्ययन कमी करून त्याऐवजी सर्वांगीण विकास आणि शोधक विचारक्षमता, सर्जनशीलता, शास्त्रीय मनन, सुसंवाद, परस्परसहकार्य, बहुभाषिकता, समस्या निवारण, नीतीतत्त्वे, सामाजिक बांधिलकी व अंकीय साक्षरता अशा 21व्या शतकातील अभिनव कौशल्यांवर आधारित अध्ययनाला चालना देण्यासाठी अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यास सुरवात झाली. त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना कशी असावी यावर संशोधकांनी, शिक्षणतज्ञांनी आणि समाजमाध्यमांनी वेगवेगळे विचार मांडले. त्या अनुषंगाने मुलाची शोधक विचारक्षमता विकसित होणे गरजेचे आहे. त्याची सर्जनशीलता विकसित करून त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली. त्या दृष्टीने बालवाडी अंगणवाडी ते माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या एकूणच कौशल्यांचा शोध घेऊन अध्यापनाला चालना देण्याचे काम सुरू झाले आहे .

- डॉ. गजानन पाटील
-------------------
सध्याच्या शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र अध्ययनार्थीच्या विकसनाच्या विविध टप्प्यांवर त्यांच्या गरजा व कल यांच्याशी सुसंगत होण्यासाठी अभ्यासक्रमाची व अध्यापनशास्त्राची पुनर्रचना करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे प्रचलित शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांची रचना व शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा 5+3+3+4 मांडणीनुसार बनवण्यात आला आहे. या पायाभूत स्तर वय 3 ते 8 वर्ष वयोगटात शीघ्र बौद्धिक विकास, खेळ व शोधनावर आधारित अध्ययन आहे तर तयारीचा स्तर वय 8 ते 11 वर्षे वयोगटात खेळ व शोधन यांच्यावर आधारित बांधणी, रचनात्मक अध्ययनाकडे संक्रमणाची सुरवात यावर भर दिला आहे. त्यानंतर वय वर्षे 11-14 या वयोगटात विषयांमधील संकल्पना शिकणे, पौगंडावस्थेतील वाटचालीस सुरवात करणे या बाबीबर अधिक भर दिला गेला आहे. दुसरा स्तर आहे वय वर्षे 14-18 या वयोगटातील. यामध्ये मुलांच्या उदरनिर्वाह व उच्च शिक्षणासाठी तयारी करण्यावर भर दिला आहे. युवा प्रौढत्वाकडे संक्रमण करणे गरजेचे असल्याने दुसऱ्या स्तरामध्ये चार वर्षांचा बहुशाखीय अभ्यासक्रम असेल आणि त्यामध्ये विषयातील खोली, शोधक विचारक्षमता, जीवनातील महत्वाकांक्षांकडे ध्यान देण्याची क्षमता विकसित केली जाईल आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीस वाव असेल. त्यासाठी अभ्यास अधिक खोलवर अभ्यास व्हावा व प्रायोगिक अध्ययन अधिक प्रमाणात व्हावे यासाठी अभ्यासक्रमाचा भार थोडासा कमी करून तो महत्वाच्या संकल्पना व आवश्यक कल्पना यांच्यापुरताच मर्यादित ठेवण्यात येईल, अशी योजना केली आहे. भाषा, शास्त्रीय मनन, सौंदर्यशास्त्र व कला यांची जाण, सुसंवाद, नैतिक कारणमीमांसा, अंकीय साक्षरता, भारताविषयी ज्ञान, स्थानिक समुदाय, देश व जगाला भेडसावत असलेल्या गंभीर व महत्वाच्या समस्यांचे ज्ञान यांमध्ये प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाईल तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या शालेय स्तरादरम्यान विषय बदलण्याची संधी व पर्याय उपलब्ध असतील. तसेच किमान पाचवीपर्यंत किंवा शक्यतो आठवीपर्यंत शिक्षण स्थानिक भाषेत, मातृभाषेत असेल आणि गरजेनुसार लवचिक भाषा (द्विभाषा) दृष्टिकोन अंमलात आणण्यात येईल. त्याचप्रमाणे गरजेनुसार व शक्य असेल तिथे उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्यात येतील. याबाबत डाएट रत्नागिरीने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्यही विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97255 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..