रत्नागिरी- साहित्य परिवर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- साहित्य परिवर्तन
रत्नागिरी- साहित्य परिवर्तन

रत्नागिरी- साहित्य परिवर्तन

sakal_logo
By

-rat१८p१.jpg- OP२२L५०८६७ रत्नागिरी : चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयात अनुलोमतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. शिवाजी उकरंडे. डावीकडून रवींद्र भोवड, गणेश कुलकर्णी, स्नेहा पालये, कविता जाधव आदी.
--------------
अण्णाभाऊ साठेंचे साहित्य
परिवर्तनाला दिशा देणारे
प्रा. उकरंडे; अनुलोमतर्फे मयेकर महाविद्यालयात अभिवादन
रत्नागिरी, ता. १७ : अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम केले. फक्त दीड दिवस शाळेत जाणारा एक सामान्य व्यक्ती आंतरीक शक्तीच्या जोरावर कसे असामान्य कार्य करू शकतो, हे अण्णांनी जगाला दाखवून दिले, त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्त्व फक्त भारताचे नाही तर ते जागतिक दर्जाचे झाले आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य, कादंबरी यांतील विचार तरुणांनी आत्मसात केल्यास निश्चितच भविष्य काळासाठी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक प्रा. शिवाजी उकरंडे यांनी यांनी केले.
चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर वरिष्ठ महाविद्यालय आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १४ सप्टेंबर रोजी रशियाची राजधानी मॉस्को येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. ही बाब भारतीयांसाठी अभिमानाची आहे. या घटनेचा आनंदोत्सव तसेच तरुण पिढीला महान अशा समाजसुधारकाच्या कार्याची माहिती व्हावी, म्हणून अनुलोम संस्थेच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते.
अनुलोम रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपविभाग प्रमुख रविंद्र भोवड यांनी सांगितले की, अण्णाभाऊंनी निर्माण केलेल्या साहित्याचा अभ्यास तरुणांनी करावा. त्यातून नवीन ऊर्जा मिळवून समाजजीवनात यशस्वी व्हावे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ. स्नेहा पालये यांनी, अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेले व महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील साहित्य अभ्यासावे असे आवाहन केले. अनुलोम रत्नागिरी भागजनसेवक मंगेश मोभारकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. कविता जाधव यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97262 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..