साडवली-माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात
साडवली-माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात

साडवली-माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१८p१०.jpg- २L५०८८१आंबव (ता. संगमेश्वर) ः इंजिनिअर्स डे च्या निमित्ताने गो कार्ट डिझाइन चॅलेंज स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या महाविद्यालयाच्या टीम फुल थ्रोटल या २५ जणांच्या टीमचा सत्कार सत्कार करताना रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत.
------

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात

साडवली, ता. १८ : संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांच्या ग्रुपने नव्याने विकसित केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरण, बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डिझाइन चॅलेंज स्पर्धेत या महाविद्यालयाच्या देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अन्य टेक्निकल स्पर्धा घेण्यात आल्या.
विविध शाखेच्या विद्यार्थी संघटनाच्या सक्रीय सहभागातून पहिल्या सत्रामध्ये महाविद्यालायांतर्गत टेक्निकल स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऑटोमोबाईल विभागाने ऑटोस्नॅप २ के२२, मेकॅनिकल विभागाने टेक्निकल स्केचिंग, इलेक्ट्रोनिक्स टेलिकम्युनिकेशन विभागाने कॅल्सी वार तर कॉम्प्युटर विभागाने प्रोग्रामिंग अँड क्विझ यासारख्या स्पर्धा घेतल्या.
मुख्य कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष रवींद्र माने उपस्थित होते. विनायक पेटकर, श्रवण करकरे या ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात डिजिटल व्हेईकल सर्विस या नावाखाली नव्याने विकसित केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले. दूरच्या प्रवासादरम्यान चालक व प्रवासी यांना बऱ्याचदा गॅरेज, जवळचे सर्विस सेंटर व इतर सुविधांची माहिती मिळवण्यात खूप अडचणी येतात. त्या सोडविण्याच्या दृष्टीने गॅरेज मालक व ऑटोमोबाईल संदर्भातील इतर आवश्यक सुविधा पुरविणारे सर्व पुरवठादार आणि यांचा समन्वय साधून त्याची एक वेबसाईट तयार करण्याची विद्यार्थ्यांची योजना आहे. यातून वाहन मालक व चालकांसाठी एका अॅपच्या माध्यमातून जोडण्याचा विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये बेंगळूरु येथे झालेल्या गो कार्ट डिझाइन चॅलेंज स्पर्धेत ऑटोक्रॉस विनर ऑल ओवर इंडिया, ऑल ओवर इंडिया रनर अप, ऑल ओवर मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम येऊन दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या महाविद्यालयाच्या टीम फुल थ्रोटल या २५ जणांच्या टीमचा सत्कार करण्यात आला. सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. यामध्ये विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97268 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..