रत्नागिरी- मोकाट गुरांची समस्या जटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मोकाट गुरांची समस्या जटील
रत्नागिरी- मोकाट गुरांची समस्या जटील

रत्नागिरी- मोकाट गुरांची समस्या जटील

sakal_logo
By

(टीप- या बातमीत पोटबातमी म्हणून Y97293 बातमी वापरावी)

फोटो ओळी
- rat18p20.jpg- KOP22L50916 रत्नागिरी ः गाडीतळ येथे रात्रीच्यावेळी निवांतपणे बसलेले मोकाट गुरे
--------------

मोकाट गुरांची समस्या जटील (७ कॉलम)

रत्नागिरी शहरात गुरांचा ठिय्या रस्त्यावरच
पालिकेला अपयश ; वाहनचालकांची कसरत
रत्नागिरी, ता. 18 ः शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांची समस्या नागरिकांसह वाहनचालकांची डोकेदुखी बनलेल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरुन फिरणारी गुरु अपघाताना कारणीभूत ठरत आहेत. दिवसभर कळपाने फिरणारी गुरे कधी रस्त्याच्या मधोमध बसून राहतात, तर कधी इकडेतिकडे फिरताना दिसतात. त्यांना चुकवून वाहने हाकण्याचे दिव्य चालकांना करावे लागते. या गोंधळात वाहनांची धडक कधी-कधी पादचाऱ्यांनाही बसत आहे. गुरांची ही समस्या पालिकेकडून कधी निकाली काढणार, असे प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
साळवी स्टॉपापासून किल्ल्यापर्यंत रत्नागिरी शहर वसलेले आहे. आजूबाजूला ग्रामीण भागही मोठ्याप्रमाणात आहे. शेतीची कामे झाली की हिवाळ्यासह उन्हाळ्यात मोकाट गुरे शहरातील बाजारात खाद्य शोधण्यासाठी येतात असा पूर्वी अंदाज बांधला जात होता; मात्र तो गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांवरुन फोल ठरला आहे. पावसाळ्यामध्ये छोट्या वासरांसह गाय, बैलांच्या झुंडी बिनधास्तपणे शहरात फिरताना दिसत आहेत.
साळवी स्टॉपसह मारुती मंदिर परिसरातील ही गुरे रात्रीच्यावेळी एमआयडीसी परिसरात बसलेली आढळतात. बाजारपेठेत फिरणारी गुरांचा मुक्काम आठवडा बाजार, मिऱ्याकडे जाणारा रस्ता, परटवणे, गाडीतळ परिसरात असतो. सकाळी हीच गुरे शहरात फिरत असतात. सकाळी दहा ते बारा या कालाधीत शहरात वाहनांचे प्रमाण सर्वाधिक असते. याचवेळी ही गुरे रस्त्याच्या मधोमध धावताना दिसतात. अचानक वाहनांच्या समोर आल्यामुळे त्यांना वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रणही जाते. दोन-चार गुरे रस्त्याच्या मध्येच बसून राहिल्यामुळे त्यांना वाचवून बाजूने गाडी काढण्याची कसरत करावी लागते. गर्दीच्या कालावधीत ही गुरे वाहनचालकांसाठीच नव्हे तर पादचार्‍यांसाठी धोकादायक बनलेली आहे. यापालिकेकडून गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली जाते, पण त्यात सातत्य नसते. काहीवेळा गुरांना शहराच्या बाहेर काढले जाते. पालिकेचे गुरे हाकलण्याचे पथक गेल्यानंतर तीच मोकाट गुरे पुन्हा शहराच्या दिशेने येतात. या गुरांचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. पालिकेतील सत्ताधार्‍यांची पाच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासकांमार्फत कारभार चालवला जातो. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांकडून याची गंभीर दखल घेतली जाणार का असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नगरपालिका प्रशासकांकडून मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करू, असे सांगितले जाते. पण तसे होत नाही. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने वेगळी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित केली तर यावर नक्कीच नियंत्रण ठेवता येऊ शकते असे बहुजन समाज पार्टी अनिकेत पवार यांनी सांगितले.
---------------
कोट
शहरात मोकटा गुरांचा त्रास गेले अनेक दिवस नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यात मोकाट कुत्रे, घोडे, खेचरांचीही भर पडलेली आहेच. प्रशासन किनारे स्वच्छतेसाठी पुढे सरसावत आहे, पण जीवावर बेतणाऱ्या या समस्येकडे जाणुनबूजून दुर्लक्ष होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा.
- छोटू खामकर, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97294 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..