वेतोरेत साकारली पर्यावरण पूरक मखर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेतोरेत साकारली पर्यावरण पूरक मखर
वेतोरेत साकारली पर्यावरण पूरक मखर

वेतोरेत साकारली पर्यावरण पूरक मखर

sakal_logo
By

50965
वेतोरे ः वरचावाडा येथील गुरुनाथ नाईक यांनी साकारलेले रिक्षेच्या प्रतिकृतील पर्यावरणपुरक मखर .


वेतोरेत साकारले
पर्यावरणपुरक मखर

रिक्षेची प्रतिकृती; गुरुनाथ नाईकांची संकल्पना

वेंगुर्ले, ता. १८ ः ना नवस, ना साकडे; परंतु काहीतरी वेगळे करण्याची भावना मनात घेऊन वेतोरे-वरचावाडा येथील गुरुनाथ नाईक यांच्या गणराया चरणी पर्यावरण पूरक अशी तीन चाकी रिक्षाची प्रतिकृती साकारून सत्यनारायण देवाचे मखर बनविले आहे. परिसरातील शेकडो भाविकांनी ती मखर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
सत्यनारायण पूजेकडे नेहमी होडी, कलश, घर, बंगला अशा प्रतिकृतीचे मखर आपण नेहमीच पाहतो. परंतु, ज्या तीन चाकी रिक्षावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो, त्याच तीन चाकी रिक्षाची प्रतिकृती आपण साकारावी, अशी संकल्पना नाईक व मित्रमंडळींना सुचली. पूजेचे हे मखर बनवण्यासाठी तब्बल आठ ते नऊ तासांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे हे मखर पर्यावरण पूरक बनविले गेले. यामध्ये कोणत्याही प्रकारे थर्माकोल प्लास्टिकचा वापर केला नव्हता. केळीचे खांब, केळीची सोपे, रिक्षेची चाके ही स्टिलच्या ताटावर रंगकाम करून बसविली गेल्याचे नाईक यांनी सांगितले. मखर बनविण्यासाठी महेश उर्फ छोटू पालव, प्रसाद नाईक, अनिकेत नाईक व अजित नाईक यांसह अनेकांचा हातभार लागल्याचे नाईक त्यांनी सांगितले. नुसती रिक्षाची प्रतिकृती साकारली नसून नाईक यांच्या रिक्षेचा क्रमांक (एम एच ०७ सी १६८९), गाडीचा इंडिकेटर, पार्किंग लाईट, हेडलाईट, ब्रेक लाईटही या प्रतिकृतीत पाहायला मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97351 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..