पावस-गणेशगुळेत सर्वपक्षीय गाव पॅनेलसाठी हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-गणेशगुळेत सर्वपक्षीय गाव पॅनेलसाठी हालचाली
पावस-गणेशगुळेत सर्वपक्षीय गाव पॅनेलसाठी हालचाली

पावस-गणेशगुळेत सर्वपक्षीय गाव पॅनेलसाठी हालचाली

sakal_logo
By

गणेशगुळेत सर्वपक्षीय पॅनेलच्या हालचाली

ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध ; भाजपाची स्वबळाचीही चाचपणी

पावस, ता. १८ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या ग्रामपंचायतीवर भाजपाप्रणित पॅनेलचे वर्चस्व असून गावामध्ये कोणतेही मतभेद असू नयेत यासाठी सर्वपक्षीय गाव पॅनेल तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र सध्या असलेले वर्चस्व आणखी बळकट करण्यासाठी भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचाही विचार करत आहे.
या ग्रामपंचायतीवर १९९७ मध्ये काँग्रेसचे पॅनेल होते. त्यानंतर २००२ मध्ये शिवसेनाप्रणित पॅनेल, २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित पॅनेलचे वर्चस्व होते. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. या सर्व निवडणुकींमध्ये सात जागांपैकी पाच जागा संबंधित पॅनेलचे वर्चस्व होते, तर दोन जागांवर भाजपप्रणित पॅनेलचे वर्चस्व होते. यातील चार वेळेला भंडारवाडी परिसरातील सरपंच- उपसरपंच निवडून आले होते. मात्र २०१७ मध्ये झालेल्या थेट सरपंच निवडणुकीमध्ये गावातील राजकारण ढवळून निघाले. खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य शिवसेनेचे असूनही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच सेना-भाजप कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यामध्ये शिवसेनेचे दोन व भाजपचे पाच सदस्य निवडून आले. थेट सरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील लाड यांचा भाजपाच्या संदीप शिंदे यांनी पराभव करून सरपंच निवडणूक जिंकली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सध्या भाजपचे वर्चस्व आहे.
या गावामध्ये गेली अनेक वर्ष राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे वारंवार राजकीय वैमन्यस्यातून वादावादी होत असते. आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे संघर्ष आणखी गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय मतभेद संपुष्टात येण्याकरिता गाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा विचार सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्याने राजकीय वातावरण बिघडलेले आहे. त्यामुळे भाजपाचे पारडे सध्यातरी जड आहे. त्यामुळे भविष्यामध्ये कोणताही धोका होऊ नये व आपणच राज्यात व केंद्रात असलेल्या सरकारचा फायदा घ्यावा या उद्देशाने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मानस आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेचा कौल मिळेल, अशी अपेक्षा येथील भाजप कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे भाजपाप्रणित पॅनेल वरिष्ठाच्या आदेशानुसार स्वबळावर लढवण्याची शक्यता आहे.
------
चौकट
मावळंगेतील निवडणुकीमुळे भाजपाला धडा
यापूर्वी मावळंगे ग्रामपंचायतीमध्ये २००७ व २०१२ मध्ये तंटामुक्त समितीच्या माध्यमातून निवडणुका सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बिनविरोध करण्यात आल्या होत्या. मात्र त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचांनी आपले वर्चस्व निर्माण करून पक्षाचे अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे भाजपाचे अनेक वर्ष ग्रामपंचायतीवर वर्चस्व असूनही या दोन वेळी पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. त्यामुळे भाजपाचे नुकसान झाले होते. हे नुकसान टाळण्यासाठी गणेशगुळे ग्रामपंचायतीमध्ये असलेले अस्तित्व आणखी बळकट करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97357 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..