चिपळूण-विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्यावा
चिपळूण-विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्यावा

चिपळूण-विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्यावा

sakal_logo
By

फोटो ओळी
rat18p30.jpg- OP22L50994 चिपळूण ः प्रवीण जाधव यांचा आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करताना मान्यवर.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्यावा

संदेश पवार : चिपळुणात गुणवंतांचा गौरव
चिपळूण, ता. १८ : गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मोक्याच्या ठिकाणी प्रवेश अथवा शिक्षण घ्यावयाचे असेल तर केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नाही, तर गुणवत्तेसह शिक्षण घ्यावे लागेल. त्याचा आपण ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार यांनी केले.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, चिपळूण विभाग क्र. 1, स्थानिक व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहोळा झाला. यावेळी संदेश पवार बोलत होते. निवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सुनील गमरे, राजेंद्र जाधव, मुरंजन कांबळे यांचा समावेश होता. तसेच प्रवीण जाधव यांचा आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
विलास सकपाळ, जयसिंग सावंत, शांताराम गमरे, हरिश्चंद्र पवार, चंद्रकांत सावंत, राजूभाई जाधव, उपसरपंच सुनील मोहिते, प्रशांत मोहिते, उमेश सकपाळ, प्रशितोष कदम, संतोष कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97384 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..