राजापूर-राजापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
राजापूर-राजापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

राजापूर-राजापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

sakal_logo
By

राजापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
राजापूर, ता. 18 ः राजापूर शहर आणि भटकी कुत्री ही गेल्या कित्येक वर्षापासूनचे समीकरण बनले आहे. झुंडीने शहरात फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कुत्र्यांच्या या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी गतवर्षी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहिम पालिकेने राबविली होती. मात्र झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षीही निर्बिजीकरणासारखी मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.
या कुत्र्यांना हाकलायचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतात. लहान मुले अंगणात खेळत असतात. वृद्ध मंडळी रस्त्यावरून ये-जा करीत असतात. वाहनधारकांच्या हमखास कुत्री पाठी लागतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून धूम ठोकावी लागत आहे.
प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार कुत्र्यांचा छळ करणे अगर त्यांना जीवे मारण्यास कायद्याने बंधन घातले आहे. कायद्यामुळे मोकाट कुत्र्यांवरील उपाययोजनांवर बंधने आली आहेत. कायद्याच्या चौकटीमध्ये राहत गतवर्षी पालिकेने झुंडीने फिरणार्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहिम राबविली होती. या मोहिमेनंतर शहरामध्ये झुंडीने फिरणार्‍या कुत्र्यांची संख्या कमी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97397 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..