निबंध कार्यशाळा लेखन कौशल्यासाठी उपयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंध कार्यशाळा लेखन 
कौशल्यासाठी उपयुक्त
निबंध कार्यशाळा लेखन कौशल्यासाठी उपयुक्त

निबंध कार्यशाळा लेखन कौशल्यासाठी उपयुक्त

sakal_logo
By

51007
कणकवली ः कौशल्य कार्यशाळेतील मुलांना मार्गदर्शन करताना संजीवनी फडके (छायाचित्र ः अनिकेत उचले)

निबंध कार्यशाळा लेखन
कौशल्यासाठी उपयुक्त

फडके ः नगरवाचनालयातर्फे निबंध लेखन

कणकवली,ता. २० ः लेखन कौशल्याचा आभ्यास करण्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन लेखन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन कार्यशाळा घेण्याचा नगरवाचनालयाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिक्षिका संजीवनी फडके यांनी केले.
येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध लेखन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्‍घाटन शिक्षिका श्री. फडके यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, सदस्य डी. जे. कांबळे, रवींद्रनाथ मुसळे, वैजयंती करंदीकर, डॉ. विनायक करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजीवनी फडके यांचा नगरवाचनालयातर्फे सत्कार झाला. या कार्यशाळेत संजीवनी फडके यांनी विद्यार्थ्यांना निबंध कशाप्रकारे लिहावा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या निबंध विषयक असलेल्या शंका-कुशंकांचे फडके यांनी निरसरण केले. कार्यशाळेत १६८ हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले. डी. पी. तानवडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विनायक करंदीकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97410 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..