साळेलच्या ‘पोखरबाव’ने घेतला मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळेलच्या ‘पोखरबाव’ने घेतला मोकळा श्वास
साळेलच्या ‘पोखरबाव’ने घेतला मोकळा श्वास

साळेलच्या ‘पोखरबाव’ने घेतला मोकळा श्वास

sakal_logo
By

51009
साळेल ः शिवकालीन विहिरीच्या साफसफाईत सहभागी ग्रामस्थ, शिवप्रेमी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी.

साळेलच्या ‘पोखरबाव’ने घेतला मोकळा श्वास

शिवप्रेमींचा पुढाकार; श्रमदानातून विहिरीची डागडुजी, साफसफाई

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः गेली २० वर्षे दुर्लक्षित असलेली साळेलमधील शिवकालीन विहिरीने शेकडो जणांच्या श्रमदानातून आज मोकळा श्वास घेतला. हा शिवकालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांसह शिवप्रेमींच्या पुढाकारातून पहिल्या टप्प्यात विहिरीसह परिसराची डागडुजी व साफसफाई करण्यात आली.
साळेल येथील मुख्य एसटी बसथांब्यानजीक असलेली पोखरबाव अर्थात शिवकालीन विहीर गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिली आहे. माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कमलाकर गावडे, सिंधुदुर्ग अॅडव्हेंचरचे डॉ. कमलेश चव्हाण, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शिवाजी पोफळे, पत्रकार सिद्धेश आचरेकर यांच्या संकल्पनेतून श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, अविनाश सामंत, मंगेश जावकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष लुडबे व पदाधिकारी, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे सचिव दादा वेंगुर्लेकर, मिथिलेश मिठबावकर, साळेल सरपंच साक्षी जाधव, उपसरपंच रवींद्र साळकर, भानजी गावडे, भटा परब यांसह दुर्गवीर प्रतिष्ठान, दुर्गमावळा प्रतिष्ठान, शिवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, साळेल ग्रामस्थ, इको युवा वर्ग आदी उपस्थित होते.
विहिरीच्या दगडांमधून उगवलेल्या झाडांमुळे पुरातन बांधकाम ढासळत चालले होते. ही बाब लक्षात घेत विहिरीमध्ये वाढलेल्या झाडांची कटाई करण्यात आली. पर्यावरणाचा विचार करताना पर्यटन दिनी साळेल गावामध्ये घरोघरी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे कमलाकर गावडे यांनी सांगितले. विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय व शिवप्रेमींनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ पुढाकार घेईल, असे मोंडकर यांनी सांगितले. यावेळी पोफळे यांनीही मार्गदर्शन करत युवा वर्गाला स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन केले.
..............
वार्षिक दीपोत्सव साजरा करणार
साळेल गाव पर्यटन नकाशावर आणायचा आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या काळात नियोजन केले जाणार आहे. शिवकालीन विहिरीची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंद घेतली जाणार आहे. त्यासाठी वार्षिक दीपोत्सवही साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97411 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..