सागरतीर्थ किनारी स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागरतीर्थ किनारी स्वच्छता अभियान
सागरतीर्थ किनारी स्वच्छता अभियान

सागरतीर्थ किनारी स्वच्छता अभियान

sakal_logo
By

51010
वेंगुर्ले ः स्वच्छता अभियानात सहभागी वेताळ प्रतिष्ठानचे सदस्य.

सागरतीर्थ किनारी स्वच्छता अभियान

‘वेताळ’चा पुढाकार; उपक्रमाचे केले कौतुक

वेंगुर्ले, ता. १८ ः भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने विकास दिनानिमित्त ''स्वच्छता व श्रमदान'' या उपक्रमांतर्गत युवक-युवतींना संघटित करत सागरतीर्थ किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.
पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासात स्वच्छ व सुंदर सागरी किनाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हे सौंदर्य टिकवून पर्यटन विकास करण्याकरिता किनारा स्वच्छता महत्त्वाची असते. याचे महत्त्व लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकीचे भान राखून तुळस (ता. वेंगुर्ले) येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने विकास दिवसानिमित्त सागर किनारा स्वच्छता केली. यावेळी
पर्यटन क्षेत्रांची शोभा कमी करणाऱ्या, आरोग्यास हानिकारक व पर्यावरणास विघातक असा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रबर, थर्माकॉल, प्लास्टिक तसेच काच आदी किनाऱ्यावर दीर्घकाळ टिकणाऱ्या कचऱ्याचा समावेश होता. प्रतिष्ठानच्या या कार्याचा आढावा घेत ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ, पर्यटकांनी कौतुक करून सर्वांचे आभार व्यक्त केले. वेताळ प्रतिष्ठान ही संस्था स्वच्छता उपक्रमात सातत्याने योगदान देत असून यावेळी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सागरी किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, सामाजिक आरोग्य ही मूल्ये जपण्याच्या हा उद्देशाने उपक्रम घेण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97412 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..