भटवाडी नवरात्रोत्सवाचा सभामंडप उभारणीस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटवाडी नवरात्रोत्सवाचा
सभामंडप उभारणीस प्रारंभ
भटवाडी नवरात्रोत्सवाचा सभामंडप उभारणीस प्रारंभ

भटवाडी नवरात्रोत्सवाचा सभामंडप उभारणीस प्रारंभ

sakal_logo
By

51011
सावंतवाडी ः सभामंडप उभारणीचा प्रारंभ करताना बबन साळगावकर.

‘भटवाडी नवरात्रोत्सवा’चा
सभामंडप उभारणीस प्रारंभ
सावंतवाडी ः भटवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते देवीच्या सभामंडप उभारणीला सुरुवात केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल शृंगारे, उपाध्यक्ष दीपक सावंत, सचिव संतोष खंदारे, सहसचिव स्वप्नील कामते, खजिनदार योगेश दळवींसह खजिनदार भार्गव धारणकर आदी उपस्थित होते. भडवाडी येथील दुर्गा देवीची नवसाला पावणारी अशी ख्याती आहे. याप्रसंगी मंडळाचे विजय सावंत, भरत परब, गौरव रामाने, सुनील जाधव, अभय खंदारे, दया साटेलकर, सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दिलीप भालेकर, प्रसाद परब, रमेश परब उपस्थित होते.
................
50888
सावंतवाडी ः निवेदन देताना सुरेश भोगटे, विलास जाधव आदी.

‘बंद मीटरप्रश्नी योग्य निर्णय घ्या’
सावंतवाडी ः तालुक्यात महावितरणचा सावळागोंधळ सुरू आहे. रिडिंग बंद असलेल्या मीटरची दुरुस्ती न करता सरासरी बिले काढून ग्राहकांच्या माथी मारली जात असून ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे, असा आरोप माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी करत बंद मीटरची तपासणी करून ते बदलून देण्यात यावेत, अशी मागणी महावितरणचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी त्यांनी शुक्रवारी आपल्या सहकाऱ्यांसह महावितरणचे अधिकारी संदीप भुरे यांना निवेदन दिले. यावेळी बंद मीटरबाबत योग्य तो निर्णय घ्या; अन्यथा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रसंगी माजी नगरसेवक विलास जाधव आदी उपस्थित होते.
---

50884
निरवडे : साई होली फेथ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली ओझोन संरक्षण जनजागृती प्रभात फेरी.

ओझोन संरक्षणदिनी निरवडेत फेरी
सावंतवाडी ः जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून १६ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र साजरा होतो. निरवडे येथील साई होली फेथ स्कूलमध्ये यानिमित्त ओझोन वायूचे पर्यावरणातील स्थान व महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन केले होते. पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले. ओझोन वायू संरक्षणाबाबत घोषणा देत जागृती केली. उपमुख्याध्यापक हेमंत तानावडे, ज्येष्ठ शिक्षक रुपेश सावंत, सहाय्यक शिक्षक मनीष सावंत, प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका संध्या पवार, सुनीता राणे, स्नेहल गवस, श्वेता जाधव, प्रियांका शिरसाटही सहभागी झाले. प्रशालेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन, कमिटी सदस्या भारती, मुख्याध्यापक गजानन पालयेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
--
50886
बांदा ः इन्सुली चेक नाका येथे चालक दिवस साजरा करताना जे. एम. पाटील, अनिल पावसकर आदी.

इन्सुली चेक नाक्यावर चालक दिन
बांदा ः इन्सुली आरटीओ चेक नाका येथे सिंधुदुर्ग परिवहन विभागाच्यावतीने चालक दिन साजरा करण्यात आला. आरटीओ निरीक्षक जे. एम. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून व वाहन चालकांना सुरक्षित वाहतूक करण्याचा संदेश देत चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यासाठी येथील उद्योजक व अनिल मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अनिल पावसकर यांनी पुढाकार घेतला. १७ सप्टेंबर हा दिवस परिवहन विभागाच्यावतीने चालक दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, आरटीओ क्लार्क मंगेश गायकवाड, मनोहर जाधव, आनंद म्हावळंकर, शेखर नाईक, प्रसाद गवंडळकर, प्रल्हाद देसाई, दिलीप बांदेकर आदी उपस्थित होते.
--
51012
विलास गावडे, संदेश निकम

अध्यक्षपदी गावडे, उपाध्यक्ष निकम
वेंगुर्ले ः मातोश्री कला, क्रीडा मंडळ दाभोली नाका-वेंगुर्ले यांच्यातर्फे साजरा होणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती २०२२ च्या अध्यक्षपदी विलास गावडे, तर उपाध्यक्षपदी संदेश निकम यांची निवड झाली. सलग २७ व्या वर्षी दाभोली नाका येथे नवदुर्गा मातेचा सार्वजनिक नवरात्रोत्सव होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, यावेळी दादा कुबल, वसंत तांडेल, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, जयंत मोंडकर, तुषार साळगावकर, प्रभाकर आजगावकर, सुनील मजरेकर, भूषण आंगचेकर, बाबली वायंगणकर, पप्पू परब, शरद मेस्त्री, दादा केळुसकर, दत्ताराम आजगावकर, बाळू प्रभू, प्रसाद मांजरकर, प्रमोद वेर्णेकर, तन्मय जोशी, ऋत्विक आंगचेकर, अविनाश सडवेलकर, राहूल मडईकर, श्रीकांत रानडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97413 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..