रत्नागिरी-शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय रत्नागिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय रत्नागिरीत
रत्नागिरी-शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय रत्नागिरीत

रत्नागिरी-शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय रत्नागिरीत

sakal_logo
By

51004
रत्नागिरी ः टु-डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर उद्‍घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री उदय सामंत.

शून्य खर्चात शस्त्रक्रियेसाठी
रत्नागिरीत रुग्णालय ः सामंत
---
राजकारण बाजूला ठेवून शिंदेंचे समर्थन करा
रत्नागिरी, ता. १८ ः ‘‘ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यांत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीत सुरू करण्यात येईल,’’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर करतानाच विकासासाठी जिल्हावासीयांनी राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहनही केले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वाडिया हॉस्पिटल आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयात लहान मुलांची मोफत टु-डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्‍घाटनानिमित्त उद्योगमंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांचे आरोग्य क्षेत्रातील काम इतके महत्त्वाचे आहे, की जागतिक स्तरावर रेकॉर्ड होईल. ते पाहिल्यावर रत्नागिरीत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्याचे निश्‍चित केले. यात ज्या ७५ मुलांची तपासणी होईल, त्यांना बरी करण्याची जबाबदारी आमची आहे. आता एवढेच करून थांबायचे नाही, ठाण्यात आनंद दिघे यांच्या नावाने सुरू असलेल्या रुग्णालयाप्रमाणे शून्य पैशात सर्जरी होईल, असे रुग्णालय पुढील दोन महिन्यांत रत्नागिरीत कसे आणता येईल, यावर काम करणार आहे. राहुल पंडित यांनी नगराध्यक्ष असताना रत्नागिरीत जी रुग्णालयासाठी इमारत बांधली आहे, त्याचा उपयोग होईल. कोरोना काळात तीच उपयोगी पडली. पैसा नसल्याने अनेक दारिद्र्यरेषेखालील, शेतकरी कुटुंबातील लोकांना शस्त्रक्रिया करता येत नाहीत, त्यांच्यासाठी ही सेवा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभारली जाईल. दर तीन महिन्यांनी रत्नागिरीत याच पद्धतीने शस्त्रक्रियांची शिबिरे घेतली जातील.’’
मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या अपेक्षांबाबत मंत्री सामंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमाला गेलो असता मी त्यांना विचारले की एवढे काम करण्याची एनर्जी तुम्हाला येते कुठून? त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की आरोग्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामांतून जे पुण्य मिळाले आहे, त्यामुळेच २४ तास काम करू शकतो. शिंदे यांची अपेक्षा एवढीच आहे, की त्यांच्या या कामांसाठी लोकांचा आशीर्वाद मिळावा. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या संकल्पना मांडल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंकडून जो कामाचा वारसा घेतला आहे, त्यासाठी सर्वोच्च सहकार्य मिळणे हीच त्यांची भावना आहे.’’
या कार्यक्रमाला विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, डॉ. स्वरूप काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, महेश म्हाप आदी उपस्थित होते. या वेळी वाडिया रुग्णालयातील डॉ. पारस कोठारी, डॉ. श्रीपाद जैन व डॉ. शिवकुमार यांचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
-------------
चौकट
पात्रता नसलेले थयथयाट करताहेत
शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा गौरव करताना मंत्री सामंत यांनी विरोधकांना चिमटे काढले. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाला शिंदे यांच्या ट्रस्टचे अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. पण, ते किती जमिनीवर आहेत पाहा. २४ तास काम करणारे मी राईट हॅण्ड की लॅफ्ट हॅण्ड हे पाहत नाहीत. त्यांच्यात गुर्मी नाही. पण, हल्ली पात्रता नसलेलेही फक्त आम्ही जवळ आहोत म्हणून फारच थयथयाट करीत फिरत आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97421 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..